अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत आठवडे बाजार प्रवास करताना व विविध ठिकाणी गहाळ झालेल्या मोबाईलचा शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने शोध घेऊ २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे १० मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत केले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. त्यामुळे मोबाईल मालकांनी शिरूर पोलिसांचे आभार मानले आहे. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर बाजारपेठ, शिरूर बस स्टॅन्ड व शिरूर पोलीस स्टेशन परिसरात मोबाईल गहाळ झाल्याचे अनेक अर्ज दाखल झालेले असून, मोठ्या किमतीचे मोबाईल गहाळ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. असंख्य मोबाईल गहाळ झाल्याने याची गंभीर दखल पोलिस अधिक्षक यांनी घेऊन हे गहाळ झालेले मोबाईल फोन हे ट्रेस करून शोधून मुळ मालकांना परत करावे, असे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले होते.
शिरूर पोलीस स्टेशनला गहाळ झालेले मोबाईल शोधण्याची सूचना शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे शिरूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अंमलदार विजय गजानन शिंदे, यांना दिल्याने त्यांनी मोबाईल ट्रेसिंगला लावुन गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषन करण्याचे काम सुरू केले होते. बहुतांश नागरिक हे एकदा गहाळ झालेले मोबाईल परत मिळण्याची आशा सोडुन देतात. शिरूर पोलीस स्टेशनच्या तपासकाचे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात काळ झालेले तब्बल दहा मोबाईल एकूण किंमत दोन लाख 25 हजार रुपये किमतीचे मोबाईल ट्रेसिंग करून परत मिळविले असून ते मूळ मालकांना आज परत केले आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे अंमलदार नीरज पिसाळ, रघुनाथ हळनोर, निखील रावडे, नितेश थोरात यांचे पोलीस पथकाने केली आहे.