उरुळी कांचन, (पुणे) : भाजप महिला मोर्चा उत्तर पुणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये पाच तालुक्यातील महिलांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हवेलीतून सारिका किशोर लोणारी, आंबेगाव येथून संयोगिता तानाजी पलांडे, मावळ येथून अलका गणेश धानविले, खेड येथून शिवकाली रामदास खेंगले तर जुन्नर येथून संगीता अजित वाघ यांची निवड करण्यात आल्याची माहिती भाजप पुणे जिल्हा महिला मोर्चा उत्तरच्या जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी यांनी दिली.
यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, सविता गावडे, सरचिटणीस संजय रौंधळ, महिला मोर्चा उत्तरच्या जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, मावळच्या महिला तालुकाध्यक्षा सायली बोत्रे, खेडच्या सभापती गवारे, विविध गावाचे सरपंच, उपसरपंच व मान्यवर उपस्थित होते. यावेळी ही नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
- सरचिटणीस – योगिता धर्मेद्र सातव, रत्ना सुरेश पिंगळे, अॅड. स्वप्ना महेंद्र पिंगळे-खामकर,
- चिटणीस – ज्योती नितीन शिंदे, भाग्यश्री रामदास गायकवाड, वैदही भूषण रणदिवे,
- कोषाध्यक्ष – विद्या विवेक काळभोर
- सोशल मिडीया अध्यक्ष – अश्विनी आशिष पांडे, सोशल मिडीया उपाध्यक्ष सुनीता लहू शिवेकर,
- कार्यकारणी सदस्य – सुनिता लहू शिवेकर, सुवर्णा रामकृष्ण खंगले, स्वाती राजेंद्र सांडभोर, निर्मला शंकर अडसुळ, सविता हरिप्रकाश वर्मा, निर्मला दत्तात्रय केसवड, काजोल विनायक कडलग, सुजाता जगदिश महेता, चारूलता चंद्रशेखर कमलवार, वासंती सुरेश जोशी या सर्व नवनिर्वाचित सदस्यांना निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.
पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार
भाजप पुणे जिल्हा महिला मोर्चा उत्तरच्या जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी म्हणाल्या, “महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या पक्षबांधणीचे काम जोरात सुरु आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.”