Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : “इथला भाई मी आहे” म्हणत बस स्टॅन्डवर तरुणाच्या डोक्यात चालवला कोयता ; चेष्टेने दिलेल्या शिव्यांचा राग आल्याने चौकात राडा, तिघांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 26 May 2026, 17:13

भिगवण, (पुणे) : “तू मोठा भाई झाला का? इथला भाई मी आहे!” असे म्हणत (Bhigwan News) करत एका तरुणाने भरचौकात चारचाकी गाडीतून धारदार कोयता काढून एका 21 वर्षीय तरुणाच्या डोक्यात गंभीर वार केल्याची घटना घडली. शेटफळगढे (ता. इंदापूर) बस स्टॅन्ड परिसरात रविवारी (ता. 24) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून याप्रकरणी भिगवण पोलिसांनी तीन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुदीप संदीप सवाणे (वय 21, व्यवसाय- सेंट्रींग, रा. शेटफळगढे, ता. इंदापूर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर तुषार नवनाथ सोनवणे, अमोल नामदेव मचाले, आशु उर्फ अक्षय सोनवणे (सर्व रा. शेटफळगढे, ता. इंदापुर) अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी सुदीप सवाणे याने भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुदीप सवाणे हा रविवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र सुरज सवाणे याच्यासोबत मोटारसायकलवरून बारामती-भिगवण रोडने शेटफळगढे येथे येत होता. त्याच वेळी त्यांचा मित्र दीपक बबन जाधव आणि तुषार नवनाथ सोनवणे हे दीपकच्या कार मधून जाताना दिसले. कारने ओव्हरटेक करताना सुदीप आणि दीपक यांनी रस्त्यात एकमेकांना नेहमीप्रमाणे चेष्टेने शिव्या देऊन चिडवले.

 

मात्र, या चेष्टा-मस्करीचा राग कारमधील तुषार सोनवणे याला आला. सुदीप गावात पोहोचल्यावर तुषारने त्याला फोन करून ‘शेटफळगढे बस स्टॅन्डवर ये’ असे सांगितले. सुदीप त्याचा मित्र प्रितम सवाणे याला सोबत घेऊन तेथे गेला आणि “मी दीपकला चेष्टेने शिव्या दिल्या, तुला काही बोललो नाही,” असे समजावून सांगू लागला. “तू मोठा भाई झाला का? इथला भाई मी आहे!” असे म्हणत थेट आपल्या कारमधून धारदार कोयता काढला आणि सुदीपच्या डोक्यात जोराने मारला. सुदीपच्या डोक्यातून रक्त वाहू लागले.

यावेळी तुषारचा चुलत भाऊ अक्षय सोनवणे यानेही तिथे येऊन सुदीपला अश्लील शिवीगाळ केली. त्याच वेळी त्यांचा दुसरा साथीदार अमोल मचाले तिथे धावून आला आणि “ही आमच्या ग्रुपची पोरं आहेत, तू आमच्या ग्रुपच्या पोरांना कशाला काय बोलला?” अशी दमदाटी करत त्यानेही गोंधळ घातला. हा वाद सुरू असताना गोपाळ वाबळे व इतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करत भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. परिसरात मोठी गर्दी जमू लागल्याचे पाहून आरोपी तुषार सोनवणे आणि दीपक जाधव हे त्यांच्या कारमधून घटनास्थळावरून सुसाट पळून गेले.

दरम्यान, या भयंकर मारहाणीनंतर जखमी सुदीपला त्याचे मित्र प्रितम आणि मंगेश सोमनाथ सवाणे यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. प्रथमोपचार घेतल्यानंतर सुदीपने भिगवण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार वरील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42
Next Post

‘कार्यसम्राट’ फक्त सोशल मीडियावरच? पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; खासदार-आमदार गेले कुठे?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.