Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 13 June 2026, 17:42

उरुळी कांचन, (पुणे) : सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’ संचलित ‘उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदान दिनानिमित्त उद्या रविवारी (ता. 14) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे परिसरातील महिला आणि विद्यार्थ्यांसाठी “माझे प्लास्टिक, माझी जबाबदारी” या संकल्पनेतून ‘प्लास्टिक बँक’ सुरू करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमांमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात उरुळी कांचनच्या या पॅटर्नचे जोरदार कौतुक होत आहे.

‘चला रक्तदान मोहिम राबवूया, रक्तदान करून जीव वाचवूया’ हा संदेश घेऊन रविवारी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उरुळी कांचन हद्दीतील बी. जी. शिर्के बाल विकास मंदिर, महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय, उरुळी कांचन या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिरात प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. रक्तदात्यास आजीवन रक्त मोफत मिळणार असून, त्याच्या नातेवाईकांना 1 वर्ष रक्त मोफत दिले जाईल. घेवूनिया आदर्श आपण केलेल्या रक्तदानाचा, लावू आम्ही एक वृक्ष आपण केलेल्या कर्तव्यपूर्तीचा! या उदात्त हेतूने रक्तदात्यांच्या सन्मानार्थ वृक्षलागवड केली जाणार आहे.

प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात 1 किलो साखर..

आपल्या घरातून बाहेर फेकले जाणारे सुका प्लास्टिक कचरा (उदा. दुधाच्या पिशव्या, वेफर्सची पाकिटे, प्लास्टिक पिशव्या, बिस्किट रॅपर) एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये गच्च भरून जमा करायचा आहे. अशा पद्धतीने संकलित केलेल्या 1 किलो प्लास्टिकच्या बदल्यात 1 किलो साखर मोफत दिली जाणार आहे. प्रत्येक महिन्यातील 2 रा आणि 4 था रविवार रोजी डाळिंब रोड, ओरियन बिल्डींग, उरुळी कांचन येथील संकलन केंद्रावर हा कचरा स्वीकारला जाईल.

 

शाळकरी मुलांसाठी “प्लास्टिक बँक”

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळांमध्येही हा उपक्रम राबवला जात आहे. विद्यार्थ्यांनी घरात किंवा परिसरात जमा झालेली प्लास्टिक कॅरीबॅग, दुधाच्या पिशव्या, चॉकलेट-चिप्सचे रॅपर एका प्लास्टिक बाटलीत गच्च भरून आपल्या वर्गशिक्षकांकडे जमा करायचे आहेत. अशा 1 किलो प्लास्टिकच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त वस्तू (वही, पेन, कंपास बॉक्स इ.) मोफत दिली जाणार आहे.

दरम्यान, ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या या ऐतिहासिक उपक्रमामुळे उरुळी कांचन आणि परिसर स्वच्छ होण्यास मोठी मदत होणार आहे. या दोन्ही उपक्रमांत जास्तीत जास्त नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp