Baramati बारामती, (पुणे) : कऱ्हा वागज (ता. बारामती) येथील एका व्यक्तीने तमाशाला नारळ वाढवण्याचा मान मिळवण्यासाठी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची बोली लावली आहे. याची सध्या चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
नारळ वाढविण्याचा मान मिळवण्यासाठी लिलावाची प्रथा…!
बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज येथे ग्राम दैवत भैरवनाथा ची वार्षिक यात्रा असते. या यात्रेत लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते. तमाशाला नारळ वाढविण्याचा मान मिळवण्यासाठी लिलावाची प्रथा आहे. यावेळी गावातील राजेंद्र भाऊ यांनी तब्बल १ लाख २५ रुपयांची बोली लावत रात्री तमशाला नारळ वाढविण्याचा मान मिळवला. तर दिवसा होणाऱ्या तमाशाचा नारळ वाढविण्यासाठी नवनाथ वायाळ यांनी तब्बल ५५ रुपयांची बोली लावली. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बोली लागल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून तमाशा बंद होता. त्यामुळे अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांना दोन वेळचे अन्न मिळणे महाग झाले होते. मात्र यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी अनेक गावात यात्रणा चांगली गर्दी होत आहे. त्यामुळे तमाशा कलावंतांना सुगीचे दिवस आले आहेत. अनेक ठिकाणी चांगली बोली लावून तमाशे केले जात आहेत.
दरम्यान, बारामती तालुक्यात लागलेली ही बोली सद्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. पारंपारिक यात्रांमध्ये तामशा ठरलेला असतो. तमाशाशिवाय त्या गावाची यात्रा यशस्वी झाली असे म्हणताच येणार नाही. त्यामुळे गावाकडे तमाशाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Baramati Crime : बारामती तालुक्यातील सांगवी येथे तरूणाचा दगडाने ठेचून खून ; परिसरात खळबळ..!