युनूस तांबोळी ; शिरूर
Shirur News : शिरूर, (पुणे) : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले (Nation Mahatma Jyotirao Phule) व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब (Vishwaratna Dr. Babasaheb Aambedakar) आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती शिरूर (Joint Jayanti Utsav Samiti Shirur) यांच्याकडून दिला जाणारा सन २००३ चा समाज रत्न (Samaj Ratna )पुरस्कार कवठे येमाई (Kavathe Yemai)(ता. शिरूर ) येथील दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बाजीराव लक्ष्मण उघडे यांना बुधवारी (ता. १२) विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. परीसरातून अभिनंदन (Congratulations) केले जात आहे. Shirur News
दलित चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी सन्मान..!
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षी सामाजिक तसेच दलित चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी सन्मानपुर्वक दिला जातो. यावर्षी दलित चळवळीतुन कार्याला सुरुवात करुन राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणारे, दलित समाजातील मंगल परीणयात बौध्दाचार्य म्हणून निशुल्क काम करणारे, राजकीय जीवनात वेगळा ठसा उमटविणारे, दलित समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष काम करणारे बाजीराव उघडे यांना दिला गेला.
दरम्यान, पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्ष नगरसेवक विनोद भालेराव, उपाध्यक्ष अविनाश शिंदे, कौस्तुभ उबाळे, सचिव विनोद शिंदे, भीमराव तराळ, मयूर भोसले, मनोज गाडेकर, रामभाऊ झेंडे, प्रमोद गायकवाड, कैलास गायकवाड, रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Shirur Crime : किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा