Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बँकेसमोर दुचाकीला लटकवली पिशवी अन् काही मिनिटांत गायब! उरुळी कांचनमध्ये 1 लाखांसह कुटुंबाची महत्त्वाची कागदपत्रे चोरट्याने लांबवली

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 20 August 2026, 10:51

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन, (पुणे) येथील सनमित्र बँकेसमोर दुचाकीच्या हँडलला लावलेली 1 लाख रुपयांची रोख रक्कम अन् कुटुंबातील सर्व सदस्यांची महत्त्वाची बँक कागदपत्रे असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. 19) दुपारी 12.30 वा ते 01.20 वाचे सुमारास उरुळी कांचन गावचे हद्दीतील सनमित्र बैंक समोर घडली.

याबाबत नाना बाबूराव गायकवाड (वय 60, व्यवसाय-शेती, रा. बोरीऐंदी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास नाना गायकवाड हे आपल्या दुचाकीवरून उरुळी कांचन येथील सनमित्र बँकेसमोर आले होते. त्यांनी आपली दुचाकी बँकेसमोर पार्क केली होती. त्यांच्या दुचाकीच्या डाव्या बाजूच्या हँडलला एक राखाडी रंगाची पिशवी अडकवलेली होती. या पिशवीत 1लाख रुपयांची रोख रक्कम तसेच कुटुंबातील सदस्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज होते. गायकवाड काही कामानिमित्त बाजूला गेले असता, संधी साधून अज्ञात चोरट्याने हँडलवरील पिशवी चोरून पळ काढला.

चोरट्याने लांबवलेल्या पिशवीत 1 लाखांच्या रोख रकमेसोबतच सर्व कुटुंबियांच्या मुदत ठेव (FD) पावत्या, चेकबुक, आर.डी. (RD) व एस.बी. (SB) खात्यांची पुस्तके, मुलगा व पत्नी यांच्या एलआयसी पावत्या, बँक ऑफ इंडियाची कागदपत्रे, स्टेट बँक उरुळी कांचन शाखेतील पेन्शन अकाउंटचे पासबुक व चेकबुक, आई पारूबाई यांच्या नावाचे चेकबुक व पासबुक आणि पती-पत्नीच्या संयुक्त खात्याचे पासबुक व चेकबुक होते.

 

दरम्यान, कामावरून परत आल्यानंतर दुचाकीवरील पिशवी गायब असल्याचे दिसताच नाना गायकवाड यांनी परिसरात शोध घेऊनही पिशवी सापडली नाही. अखेर त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार रमेश भोसले करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पेरू खाण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; नराधमाला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Thursday, 20 August 2026, 20:33

ओडिशातून गांजा आणणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

Thursday, 20 August 2026, 20:30

लग्न करण्यासाठी खाकी वर्दी घालायची! महिलेचा आरपीएफ अधिकारी असल्याचा बनाव; पोलिसांनी तपासचक्र फिरवली अन् बिंग फुटलं

Thursday, 20 August 2026, 19:54

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक! भाषा चाचणीत अपयशी ठरल्यास थेट परवाना निलंबनाची कारवाई

Thursday, 20 August 2026, 19:17

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! आता सुटे खाद्यतेल विक्रीवरही निर्बंध; एफडीएची कडक मोहीम

Thursday, 20 August 2026, 18:50

‘आता पुढचा नंबर कोणाचा?’ पीएमआरडीएच्या कारवाईने लोणी काळभोरमधील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले; प्लॉटिंग-होर्डिंग चालकांमध्ये भरली धडकी!

Thursday, 20 August 2026, 18:45
Next Post

‘मुलगी आहे? मग गर्भपात कर!’ पुण्यातील PSI पतीवर पत्नीचा गंभीर आरोप; 7 महिन्यांची गर्भवती असतानाही केली मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp