Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मुलगी आहे? मग गर्भपात कर!’ पुण्यातील PSI पतीवर पत्नीचा गंभीर आरोप; 7 महिन्यांची गर्भवती असतानाही केली मारहाण

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 20 August 2026, 10:55

पुणे: पुण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीविरोधात पत्नीने गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पती आणि सासूने गेल्या काही वर्षांपासून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा दावा महिलेने केला आहे. गर्भवती असतानाही मारहाण केल्याचा, तसेच बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी पती धनाजी रंगराव टोणे आणि त्याची आई अनसूया रंगराव टोणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, मे 2019 मध्ये तिचे लग्न झाले. लग्नानंतर काही काळातच पतीकडून नोकरी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे तिने सांगितले. “तू नोकरी कर, माझ्या जिवावर बसून खाऊ नको, तुला तुळशीसारखी सडवीन” अशी धमकी दिली. तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुरू झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 2020 मध्ये ती 7 महिन्यांची गर्भवती असताना पतीने तिला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच, पत्नीला मुलगा होत नसल्याचे सांगून तिच्यावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही महिलेने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गंभीर कलमांनुसार कारवाई सुरू केली आहे.

मे 2025 मध्ये पतीने आईच्या मदतीने गर्भलिंग तपासणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. गर्भात मुलगी असल्याचे समजल्यानंतर तिच्यावर गर्भपातासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याचा दावा तिने तक्रारीत केला आहे.

 

यापूर्वी महिलेने पतीविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचेही समोर आले आहे. आरोपी धनाजी टोणे हा मांजरी पोलीस ठाण्यात PSI म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो सुट्टीवर गेल्याचे सांगण्यात येत असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक इरफान नदाफ करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘मुलगी आहे? मग गर्भपात कर!’ पुण्यातील PSI पतीवर पत्नीचा गंभीर आरोप; 7 महिन्यांची गर्भवती असतानाही केली मारहाण

Thursday, 20 August 2026, 10:55

बँकेसमोर दुचाकीला लटकवली पिशवी अन् काही मिनिटांत गायब! उरुळी कांचनमध्ये 1 लाखांसह कुटुंबाची महत्त्वाची कागदपत्रे चोरट्याने लांबवली

Thursday, 20 August 2026, 10:51

‘कर्करोगामुळे मला खूप त्रास होतोय…’ पत्नीला शेवटचं सांगितलं, ती जेवण आणायला गेली अन् समोर दिसला पतीचा जळून खाक झालेला मृतदेह; वडगाव रासाई येथील घटना

Thursday, 20 August 2026, 10:46

लाडकी बहीण योजनेला धक्का! 92 लाख महिला अपात्र; आता फक्त पात्र लाभार्थींनाच मिळणार 1,500 रुपयांचा लाभ

Thursday, 20 August 2026, 10:40

उरुळी कांचनमधील सन 2024 च्या प्रलंबित जन्म-मृत्यू नोंदींचा प्रश्न सह्याद्री अतिथीगृहावर; ऑनलाइन CRS पोर्टलवर नोंदी तात्काळ करण्याची जितेंद्र बडेकर यांची मागणी

Thursday, 20 August 2026, 10:29

पालकांचा खर्च वाचणार! विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 20 August 2026, 9:22
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.