Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 September 2026, 19:32

पुणे : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी नीरव मोदीचा निकटचा सहकारी संदीप मिस्त्री याला संयुक्त अरब अमिराती (युएई) येथून अटक करण्यात आली असून, प्रत्यार्पण प्रक्रियेद्वारे त्याला भारतात आणण्यात आले आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये विशेष न्यायालयाने संदीपविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. या कारवाईनंतर मंगळवारी त्याला विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 6 ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

संदीप मिस्त्री हा नीरव मोदीच्या हाँगकाँगस्थित ‘फॅन्सी क्रिएशन लिमिटेड’ या कंपनीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. सुमारे 6,498.20 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. सीबीआयच्या अहवालानुसार, भारतात गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीपने नीरवच्या भावाच्या मदतीने दुबईतील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि डमी संचालकांना अटकेची भीती दाखवून इतर देशांत पळून जाण्यास भाग पाडले. तसेच, तपासादरम्यान महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने डिजिटल साधने व मोबाईल फोन नष्ट केल्याचा दावाही तपास यंत्रणांनी केला आहे.

मुंबईतील ब्रॅडी हाऊस येथील पीएनबी शाखेत बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट हमीपत्रे तयार करण्यात आली होती. या माध्यमातून एकूण 13,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप विविध आरोपींवर आहे.

दरम्यान, सध्या लंडनच्या एचएमपी वँड्सवर्थ तुरुंगात असलेला मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठीही सीबीआय आणि ईडी (प्रवर्तन निर्देशनालय) सातत्याने कायदेशीर प्रयत्न करत आहेत. त्यालाही लवकरच भारतात आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी सुनावणी! खरातच्या ‘त्या’ व्हिडिओंबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश; ‘व्हिडीओ वकिलांना दाखवा पण…’

Wednesday, 30 September 2026, 20:26

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28
Next Post

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp