Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 29 September 2026, 19:50

शिरूर : कारेगाव (ता.शिरूर) येथील साईनगर परिसरात पाण्याच्या प्लांटमध्ये कामावर गेलेल्या एका 39 वर्षीय व्यक्तीचा पिस्तुलातून गोळी झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.29) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे कारेगाव परिसरात खळबळ उडाली असून, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हामजा उस्मान शेख (वय 39,सध्या रा. कारेगाव-साईनगर,ता.शिरूर,मूळ रा.धानोरा काळे,ता.पूर्णा,जि.परभणी) हे नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता.29) सकाळी कामावर गेले होते. सकाळी सुमारे सव्वा सहा ते पावणेसात वाजण्याच्या दरम्यान कारेगाव हद्दीतील साईनगर येथील विकास नवले यांच्या इमारतीलगत असलेल्या ‘समु इंटरप्रायजेस एक्वा रिच’ या पाण्याच्या प्लांटमध्ये अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या हामजा शेख यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मृताची पत्नी अबिताबी हामजा शेख (वय 37) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमांच्या अंतर्गत व शस्त्र अधिनियम कलम अन्वये रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक,शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे करीत आहेत.गोळीबाराचे नेमके कारण काय,हल्लेखोर कोण होता, तसेच हल्लेखोराने कोणत्या कारणातून हा हल्ला केला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान,या घटनेमुळे कारेगाव-साईनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात हल्लेखोराचा लवकरात लवकर छडा लावून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे

 
योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp