Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 10 November 2026, 12:49

शिरूर:शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला असून, सत्तासंघर्षाने टोक गाठले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यांच्या गठबंधनाला उद्योगपती प्रकाश धारिवाल आणि माजी आमदार, ॲड.अशोक पवार यांची संमती असतानाही केवळ अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मितेश गादिया यांना उपनगराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. या घडामोडीनंतर शरद पवार गटातील नगरसेवक कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे.

शिरूर शहराच्या राजकारणात प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांचे वर्चस्व आणि राजकीय प्रभाव नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने शरद पवार गटाला दिलेला राजकीय धक्का हा अप्रत्यक्षपणे प्रकाश धारीवाल यांच्या प्रभावाला आव्हान देण्याची खेळी असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

मितेश गादिया यांना पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नगरसेवक तथा गटनेते रवींद्र ढोबळे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत नगरपरिषदेच्या कारभाराचा पंचनामा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, रवींद्र ढोबळे, मितेश गादिया, पाणीपुरवठा समितीच्या सभापती सुनीता पोटे, स्वप्नाली जामदार, चारुशीला कोळपकर, अमोल चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुनीता पोटे यांनी पाणीपुरवठा निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप केला. तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे केली जात असून, पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनाच विविध कामांची कंत्राटे दिली जात असल्याचा दावाही पोटे यांनी केला. गटनेते रवींद्र ढोबळे यांनी तर शिरूर नगरपरिषदेचे कामकाज वाघोलीतून नियंत्रित होत असून, नगरपालिकेचा सर्व कारभार आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षांचे पती हेच करीत आहेत. अशी टीका करत सध्या नगरपालिकेत ‘वाघोली पॅटर्न’ सुरू असल्याचा टोला ढोबळे यांनी लगावला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गठबंधन असताना, मितेश गादिया यांना उपनगराध्यक्ष पदावरून पायउतार केल्यामुळे वेळप्रसंगी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून न्यायालयीन लढाई लढण्याचा इशाराही ढोबळे यांनी दिला. मितेश गादिया, स्वप्नाली जामदार, चारुशीला कोळपकर आणि अमोल चव्हाण या नगरसेवकांनी विकासकामांमध्ये नगराध्यक्षांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या युतीतून नगरपरिषदेत ‘पाचर्णे ‘ समीकरण उदयास आले असले, तरी या सत्तेला शरद पवार गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात उद्योगपती प्रकाश धारीवाल आणि माजी आमदार ॲड.अशोक पवार यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष हा केवळ पदांचा राहिला नसून शिरूरच्या राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईत रूपांतरित झाला आहे. त्यामुळे आगामी काळात कोणाची राजकीय खेळी यशस्वी ठरणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00

मुंबई-पुणे प्रवाशांना ऐन दिवाळीत मनस्ताप! पाचपैकी दोन मार्गिका बंद! सणासुदीच्या काळात दुरुस्तीचे काम काढल्यामुळे वाहनचालकांचे हाल

Monday, 9 November 2026, 16:59
Next Post

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp