Monday, November 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 9 November 2026, 19:02

पुणे : शहरात आठवडाभरापासून हवेची गुणवत्ता ढासळलेली असतानाच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषणात आणखी भर पडली. रविवारी (८ नोव्हेंबर) संध्याकाळनंतर मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये फटाक्यांचा धूर पसरल्याने अनेक भागांत धुरके (स्मॉग) निर्माण झाले. पुण्यापेक्षाही पिंपरी-चिंचवडमधील हवेची गुणवत्ता अधिक खराब नोंदविण्यात आली.

न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी तसेच शांतता क्षेत्रात फटाके वाजवण्यावर निर्बंध घातले आहेत. गेल्या महिनाभरापासून जनजागृतीपर उपक्रम राबवून मोठ्या आवाजाचे आणि अधिक धूर निर्माण करणारे फटाके टाळण्याचे आवाहनही करण्यात येत होते.

मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. आवाजी आणि आकाशात मोठ्या प्रमाणात प्रकाश निर्माण करणाऱ्या फटाक्यांमुळे हवेत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले. हवा स्थिर असल्याने धूर परिसरातच रेंगाळला आणि अनेक भागांत धुरकट वातावरण निर्माण झाले.

शिवाजीनगर, हडपसर, कात्रज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात धुरके दिसून आले. श्वसनासाठी घातक असलेल्या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला. अनेकांना सर्दी, शिंका, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवला.

भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’ विभागाकडून आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दररोज हवेच्या गुणवत्तेची नोंद घेतली जाते. दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांच्या निरीक्षणांमध्ये ८ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक वायुप्रदूषण नोंदविण्यात आले.

काही भागांतील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’, तर काही ठिकाणी ‘वाईट’ श्रेणीत होती. विशेषतः सायंकाळी सातनंतर हवेची गुणवत्ता अधिक खालावल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

दरम्यान, दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेतही रविवारी सकाळी मोठी घसरण झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४८३ वर पोहोचला. त्यामुळे दिल्लीतील हवा ‘गंभीर’ श्रेणीत नोंदविण्यात आली. राष्ट्रीय राजधानीतील अनेक भागांमध्ये प्रदूषणाची पातळी ४०० च्या पुढे गेली होती.

प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन दिवाळीच्या दोन दिवस आधी, शुक्रवारी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) दिल्ली-एनसीआरमध्ये ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’चा तिसरा टप्पा लागू केला होता. त्यानंतरही रविवारी हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण नोंदविण्यात आली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00

मुंबई-पुणे प्रवाशांना ऐन दिवाळीत मनस्ताप! पाचपैकी दोन मार्गिका बंद! सणासुदीच्या काळात दुरुस्तीचे काम काढल्यामुळे वाहनचालकांचे हाल

Monday, 9 November 2026, 16:59

पुण्यात पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सराईत गुंडाचा थरारक खून! कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून रक्तरंजित थरार…

Monday, 9 November 2026, 16:03

शरद मोहोळ हत्याकांडात गणेश मारणेला न्यायालयाचा मोठा दणका! पुण्यात ‘नो एंट्री’; विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय

Monday, 9 November 2026, 14:59
Next Post

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp