Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतातील कामे सांगितल्याचा राग; नातवाकडून ८४ वर्षीय आजोबांची लोखंडी गजाने हत्या

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 15 June 2026, 18:27

न्हावरे: शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून रागाच्या भरात एका २६ वर्षीय नातवाने आपल्या ८४ वर्षीय वृद्ध आजोबांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर) येथे सोमवारी(दि.१५)सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी नातवाला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले आहे.

दशरथ यशवंत राऊत (वय ८४, रा. बाभुळसर बुद्रुक ,ता.शिरूर, जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या वृद्ध आजोबाचे नाव असून, सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय २६) या नातवाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत दशरथ राऊत यांचा मुलगा दुर्योधन दशरथ राऊत यांनी मांडवगण फराटा औटपोस्ट पोलीस चौकी अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, सोमवारी सकाळी आठच्या सुमारास राऊत कुटुंबाच्या राहत्या घरात ही घटना घडली. दशरथ राऊत हे नातू सोमनाथ याला शेतातील कामांबाबत सूचना देत होते. मात्र,या गोष्टीचा राग मनात धरून सोमनाथने संतापाच्या भरात लोखंडी गज उचलून आजोबांच्या डोक्यावर व पाठीवर जोरदार प्रहार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात दशरथ राऊत गंभीर जखमी झाले. डोक्यावर व शरीरावर गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीचा शोध सुरू केला. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही वेळातच आरोपी सोमनाथ राऊत याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

गावातील शांत वातावरणाला हादरा देणाऱ्या या घटनेमुळे बाभुळसर बुद्रुक परिसरात शोककळा पसरली असून, नातवाकडूनच आजोबांची हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पहाटे गोळीबार! वानवडीत पोलीस-गुन्हेगार चकमक; 30 हून अधिक गुन्हे असलेल्या सराईतावर पोलिसांचा गोळीबार

Sunday, 21 June 2026, 13:38

इंदापुरात अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने ठेचून निर्घृण खून; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद

Sunday, 21 June 2026, 12:59

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक नंदकुमार कोळी यांची नियुक्ती

Sunday, 21 June 2026, 12:48

कुरकुंभच्या ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’ला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; 48 तासांत वीज-पाणी तोडण्याचे आदेश

Sunday, 21 June 2026, 12:38

येरवडा मनोरुग्णालयात फक्त एका ‘चादरीवरून’ वाद झाला अन् घडलं भयंकर…

Sunday, 21 June 2026, 12:32

पुण्यात ‘मी इथला भाई’, म्हणत नागरिकांना धमकावणाऱ्या गुंडाचा राडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

Sunday, 21 June 2026, 11:49
Next Post

आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारणे तरुणाला पडले महागात; तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.