Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथील ‘साईकृपा टी हाऊस’मध्ये चहा प्यायला जाताना टेम्पोने दिली धडक; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, लग्नकार्यासाठी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 23 June 2026, 10:52

यवत, (पुणे) : मावस बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाला भरधाव अज्ञात टेम्पोने दिलेल्या धडकेत तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना यवत (ता. दौंड) येथे 10 मे 2026 सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ‘बिकानेर स्वीट्स’ समोर घडली.

विजय गंगाधर बाबर (वय-29, रा. धर्मगाव रस्ता, मार्केटयार्ड, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे बंधू विजय गंगाधर बाबर हे भावाच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे आणि मूळ गावी मंगळवेढ्यात अंत्यविधी व इतर कडक धार्मिक विधी पार पाडण्यात व्यस्त असल्याने बाबर हे तात्काळ पोलिसांत येऊ शकले नाहीत. मनस्थिती सावरल्यानंतर यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय बाबर, त्यांचा मोठा भाऊ विजय बाबर आणि आई सयाबाई बाबर हे सर्वजण रविवारी 10 मे ला आपल्या मावस बहिणीच्यालग्नासाठी मंगळवेढ्याहून यवत येथे आले होते. सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास, विजय बाबर हा यवत गावातील ‘बिकानेर स्वीट्स’ समोर पुणे-सोलापूर हायवेच्या कडेला उभा होता. हायवेच्या पलीकडे असलेल्या ‘साईकृपा टी हाऊस’मध्ये चहा पिण्यासाठी जाण्याकरिता तो रस्ता ओलांडण्याच्या तयारीत होता आणि वाहनांची पाहणी करत होता.

 

त्याच वेळी पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने एक विटकरी रंगाचा टेम्पो (एम.एच. १३/सी.यू/९०८७) भरधाव वेगात आला. या टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विजय बाबर याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की विजय बाबर थेट डांबरी रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला, तोंडाला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला.

जमलेल्या नागरिकांनी तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलावून विजयला यवत सरकारी दवाखान्यात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील कडक उपचारासाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. ससूनच्या आयसीयू वार्डात उपचार सुरू असतानाच, दुसऱ्या दिवशी 11 मे ला रोजी सकाळी सहा वाजता विजय बाबर याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, मंगळवेढ्यात अंत्यविधी व इतर कडक धार्मिक विधी झाल्यानंतर व मनस्थिती सावरल्यानंतर यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यवत पोलिसांनी याप्रकरणी फरार टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सोनावणे करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे रेल्वे प्रवाशांनो सावधान! 5 जुलैला रेल्वेचा 9 तासांचा ‘मेगा ब्लॉक’; गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत

Friday, 26 June 2026, 22:24

महागड्या पार्ट्या, हट्टी स्वभाव अन् त्यातच दारूचं व्यसन! पोलिसांनी उकरून काढला सियाचा भूतकाळ; व्हायरल व्हिडीओने खळबळ…

Friday, 26 June 2026, 21:39

“पोलिसांचा लाडका आहे का तो?” विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आक्रमक, खासदार सोनवणेंना थेट सवाल

Friday, 26 June 2026, 20:41

विरोधक झाले सहप्रवासी! उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकाच विमानात प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Friday, 26 June 2026, 19:53

केतनला संपवण्यासाठी ‘लोहगड’च का निवडला? सिया अन् चेतनचा जबाबात धक्कादायक खुलासा…

Friday, 26 June 2026, 19:16

समाजसुधारणेचा विचार आजही प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. विजयकुमार घोडके

Friday, 26 June 2026, 19:08
Next Post

बंडखोरांची पोलखोल! विकास निधीच्या नावाखाली बंडाचे नाटक; कोट्यवधी रुपये पडून असूनही कामे ठप्प

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.