Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतनला संपवण्यासाठी ‘लोहगड’च का निवडला? सिया अन् चेतनचा जबाबात धक्कादायक खुलासा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 June 2026, 19:16

पुणे: पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून आणखी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनची हत्या करण्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड ही अचानक केली नव्हती, तर त्यामागे आधीपासून आखलेले नियोजन असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, केतन अग्रवालला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती आणि ही बाब सिया गोयलला चांगलीच माहिती होती. याच आवडीचा फायदा घेत त्याला लोहगड किल्ल्यावर नेण्याचा कट रचण्यात आला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सिया आणि केतन लोहगडावर गेले होते. हा केवळ ट्रेक नसून संपूर्ण परिसराची रेकी करण्यासाठीच हा दौरा करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या भेटीदरम्यान सियाने किल्ल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे, त्यांची ठिकाणे आणि कॅमेऱ्यांच्या नजरेपासून दूर असलेले भाग यांची माहिती गोळा केल्याचे तपासात समोर आले आहे.

 

याशिवाय, लोहगडावरील विविध मार्ग, कड्यांची ठिकाणे आणि परिसराची माहिती मिळवण्यासाठी आरोपींनी गुगल आणि यूट्यूबवर लोहगड किल्ल्याचे अनेक व्हिडिओ पाहिल्याचेही पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, १८ जून रोजी केतन अग्रवालला नियोजनपूर्वक लोहगडावर नेण्यात आले आणि त्याठिकाणी त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाईलमधील काही डेटा डिलीट करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी करत असून, हत्येच्या कटाशी संबंधित आणखी तांत्रिक पुरावे आणि माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

व्हायरल झाल्यावरच जागे झाले प्रशासन! केरबा खोरे यांच्या अश्रूंनी उघडे पाडले सरकारी यंत्रणेचे अपयश……

Wednesday, 29 July 2026, 16:12

पुण्यातील भाजप आमदारांवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; प्रकरण थेट सरसंघचालकांकडे, अडचणी वाढणार?

Wednesday, 29 July 2026, 16:00

कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही पैसे मिळण्यात अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा? जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन

Wednesday, 29 July 2026, 15:49

पुण्यात आता भटक्या कुत्र्यांची जनगणना; पालिका खर्च करणार तब्बल ₹25 लाख!

Wednesday, 29 July 2026, 15:00

आईच्या कुशीत होतं दीड वर्षांचं लेकरू… मागून आला कंटेनर अन् एका धडकेत दोघांचा अंत; पुण्यात घडलं भयंकर

Wednesday, 29 July 2026, 15:00

पुणेकरांसाठी मोठा दिलासा! ताम्हिणी घाट गुरुवारपासून पुन्हा सुरू; पण ‘या’ वाहनांना परवानगी नाही

Wednesday, 29 July 2026, 14:31
Next Post

विरोधक झाले सहप्रवासी! उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकाच विमानात प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.