Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोरतापवाडी येथील ‘नीलकंठ मोटर्स’ मधून जुनी कार घेतली अन् डेंटिंग-पेंटिंगच्या नावाखाली परस्पर विकली; उरुळी कांचन पोलिसांत एकावर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 23 September 2026, 16:44

उरुळी कांचन, ता. 23 : जुनी कार खरेदी केल्यानंतर डेंटिंग-पेंटिंग करून देण्याच्या बहाण्याने कार ताब्यात घेतली आणि ती परस्पर दुसऱ्याला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात 3 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश मारुती चौधरी (रा. पेठ, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, याबाबत योगेश रामदास गोठे (वय 35, रा. बोरीऐंदी, ता. दौंड) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश गोठे हे 7 मे 2026 रोजी त्यांचा भाचा विजय सकट याच्यासोबत सोरतापवाडी येथील निलकंठ मोटर्समध्ये जुनी कार खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथे आकाश चौधरी याने मारुती सुझुकी वॅगनआर (एमएच-14 GS-6940) ही कार दाखवली. कार पसंत पडल्यानंतर तिचा व्यवहार 3 लाख 25 हजार रुपयांना ठरल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर 17 जुलै रोजी आकाश चौधरीच्या माध्यमातून बारामती येथील ए.यू. स्मॉल फायनान्सकडून कारसाठी 3 लाख 10 हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले. कर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार फिर्यादीच्या नावावर करण्यात आली. मात्र, कारचे डेंटिंग-पेंटिंगचे काम करून देण्याचे सांगून आकाश चौधरी याने कार स्वतःच्या ताब्यात ठेवली. कार परत मिळावी म्हणून फिर्यादीने वारंवार मागणी केली असता, “दुरुस्ती झाली नाही, आज देतो… उद्या देतो,” अशी कारणे सांगून कार देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, आकाश चौधरी याचा पेठ येथे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर चौधरी याने कार आपल्याला न देता परस्पर अन्य व्यक्तीला विकल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सोमनाथ चितारे करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करणारे तिघे उच्चशिक्षित; एक जर्मनीत नोकरीला!

Saturday, 14 November 2026, 9:34

मारुती नवले यांच्या अडचणी वाढल्या; सिंहगड संस्थेच्या गैरकारभाराची CBI, ED कडून चौकशी, विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई

Saturday, 14 November 2026, 9:29

पुण्याहून नागपूरला जाणारी बस पुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी

Saturday, 14 November 2026, 9:21

पुण्याला थंडीचा तडाखा; शेकोट्यांचा आधार! पारा 12 अंशांवर; बोचरे वारे अन् धुक्यामुळे पुणेकरांची हुडहुडी

Saturday, 14 November 2026, 9:10

Pune News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, कुऱ्हाडीने 14 वार करून केली होती हत्या; मुलीच्या साक्षीने वडिलांना जन्मठेप

Saturday, 14 November 2026, 9:00

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 आणि 16 नोव्हेंबरला पुण्यात

Saturday, 14 November 2026, 8:32
Next Post

दिशा सालियन प्रकरणात विनायक राऊतांचा संताप अनावर; वडिलांवर गंभीर आरोप,. ‘मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी........

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp