Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मारुती नवले यांच्या अडचणी वाढल्या; सिंहगड संस्थेच्या गैरकारभाराची CBI, ED कडून चौकशी, विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 14 November 2026, 9:29

पुणे: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या (STES) आर्थिक व्यवहारांची आता  CBI, ED आणि आयकर विभागाकडून चौकशी होणार आहे. संस्थेच्या कारभारातील कथित अनियमितता, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि निधीच्या वापराबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), सक्तवसुली संचालनालय (ED) आणि आयकर विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त मारुती नवले यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार, संस्थेची बँक खाती आणि गुंतवणूक गोठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विश्वस्तांच्या मालमत्तेच्या व्यवहारांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. मारुती नवले यांच्यासह अन्य विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई करण्यात आली असून, दर शुक्रवारी डेक्कन पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. संस्थेच्या तांत्रिक शिक्षण संस्थांचा कारभार प्रशासकाकडे देण्याबाबतही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य कारण म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून रखडलेले वेतन आणि निवृत्तीवेतनाचे लाभ. संस्थेच्या 44 शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे सुमारे 8 वर्षांपासून वेतन थकीत असल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्यात आला. कर्मचाऱ्यांना देण्यासाठी 60 कोटी 65 लाख रुपये देण्याचे आश्वासन संस्थेने दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

या आर्थिक अडचणींमुळे काही कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची बाबही सुनावणीदरम्यान मांडण्यात आली. याशिवाय न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मारुती नवले आणि अन्य विश्वस्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

या प्रकरणाशी संबंधित 220 याचिकांवर विशेष खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. आता 19 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी पार पडणार असून, त्याकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मारुती नवले यांच्या अडचणी वाढल्या; सिंहगड संस्थेच्या गैरकारभाराची CBI, ED कडून चौकशी, विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई

Saturday, 14 November 2026, 9:29

पुण्याहून नागपूरला जाणारी बस पुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी

Saturday, 14 November 2026, 9:21

पुण्याला थंडीचा तडाखा; शेकोट्यांचा आधार! पारा 12 अंशांवर; बोचरे वारे अन् धुक्यामुळे पुणेकरांची हुडहुडी

Saturday, 14 November 2026, 9:10

Pune News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, कुऱ्हाडीने 14 वार करून केली होती हत्या; मुलीच्या साक्षीने वडिलांना जन्मठेप

Saturday, 14 November 2026, 9:00

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 आणि 16 नोव्हेंबरला पुण्यात

Saturday, 14 November 2026, 8:32

मोशी डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार मोफत घरं; महापालिकेचा मोठा निर्णय

Saturday, 14 November 2026, 8:24
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp