Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याला थंडीचा तडाखा; शेकोट्यांचा आधार! पारा 12 अंशांवर; बोचरे वारे अन् धुक्यामुळे पुणेकरांची हुडहुडी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 November 2026, 9:10

डॉ. अशोक बालगुडे

पुणे: पुण्याच्या थंडीने अखेर आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली आहे. कालपर्यंत गुलाबी थंडीचा आनंद घेणारे पुणेकर आता स्वेटर, मफलर आणि कानटोप्यांच्या आश्रयाला गेले आहेत. पहाटे धुक्याची चादर, अंगाला झोंबणारे वारे आणि घसरता पारा यामुळे शहरात हुडहुडी भरली आहे. थंडीने अशी काही पकड घेतली आहे की, सकाळच्या फेरफटक्यालाही आता ‘गरम कपड्यांचे कवच’ घालूनच बाहेर पडावे लागत आहे!

एनडीए परिसरात शुक्रवारी (दि. १३) किमान तापमानाची नोंद ११.९ अंश सेल्सिअस झाली. गुरुवारी हाच पारा १२.६ अंशांवर होता. म्हणजे थंडीने एका दिवसातच आणखी जोर पकडला. माळीण येथे १२.६, हवेलीत १३.४, शिवाजीनगरमध्ये १४.३, पाषाणमध्ये १४.५ आणि पुरंदरमध्ये १४.९ अंश तापमान नोंदले गेले. हडपसरमध्ये १६.६, तर मगरपट्ट्यात १८.२ अंशांची नोंद झाली.

थंडीचा पारा खाली येताच रात्री आणि पहाटे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. चहाच्या टपऱ्यांवर गर्दी वाढली असून, गप्पांचा विषयही एकच ‘आज किती थंडी आहे!’ मॉर्निंग वॉकला निघणाऱ्यांच्या अंगावर ट्रॅकसूटपेक्षा स्वेटर, मफलर आणि कानटोप्यांचेच वर्चस्व दिसू लागले आहे. गुलाबी थंडीचा आनंद घेणाऱ्यांनाही आता गारठ्याची जाणीव होऊ लागली आहे.

पुढील दोन दिवसांत गारठा आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री बाहेर पडताना उबदार कपडे वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच थंडीत तहान कमी लागली तरी पुरेसे पाणी प्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

एकूणच, पुण्यात थंडीची एन्ट्री आता केवळ हवामानाच्या नोंदीपुरती राहिलेली नाही; तिचा मुक्काम घराघरांत, शेकोट्यांभोवती आणि चहाच्या कपांतही दिसू लागला आहे. उन्हाळ्यात उकाड्याला दोष देणारे पुणेकर आता थंडीच्या नावाने कुडकुडत आहेत. ऋतू बदलला की पुण्याच्या गप्पांचा विषयही बदलतो, हेच खरे!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्याला थंडीचा तडाखा; शेकोट्यांचा आधार! पारा 12 अंशांवर; बोचरे वारे अन् धुक्यामुळे पुणेकरांची हुडहुडी

Saturday, 14 November 2026, 9:10

Pune News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, कुऱ्हाडीने 14 वार करून केली होती हत्या; मुलीच्या साक्षीने वडिलांना जन्मठेप

Saturday, 14 November 2026, 9:00

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 आणि 16 नोव्हेंबरला पुण्यात

Saturday, 14 November 2026, 8:32

मोशी डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार मोफत घरं; महापालिकेचा मोठा निर्णय

Saturday, 14 November 2026, 8:24

Maharashtra Weather: नोव्हेंबरच्या मध्यात महाराष्ट्रात दुहेरी वातावरण! सकाळी गारवा, दुपारी उन्हाचा तडाखा; हवामानाचा अंदाज काय?

Saturday, 14 November 2026, 7:41

Daily Horoscope: शनिवार ठरणार भाग्यशाली! 14 नोव्हेंबरला ‘या’ राशींच्या आयुष्यात येणार पैसाच पैसा, तर काहींना मिळणार मोठी आनंदाची बातमी

Saturday, 14 November 2026, 7:32
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp