Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिलेच्या पोटातून काढली तब्बल तीन किलोची गाठ; उरुळी कांचन येथील प्राईमप्लस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून दिले महिलेला जीवदान

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 8 October 2025, 17:30
A three-kilogram tumor was removed from a woman's stomach; Doctors at Primeplus Hospital in Uruli Kanchan performed the surgery and saved the woman's life.

Photo-Pune Prime News

उरुळी कांचन, ता. 08: येथील प्राईमप्लस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अत्यंत कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करून बारामती तालुक्यातील एका महिलेच्या पोटातील तब्बल तीन किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढून तिचे प्राण वाचवले आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटलच्या डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. (Primeplus Hospital in Uruli Kanchan)

बारामती तालुक्यातील ही महिला अत्यवस्थ अवस्थेत प्राईमप्लस हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. काही महिन्यांपासून ती पोटाच्या संबंधित गंभीर आजाराने त्रस्‍त होती. तपासणी दरम्यान सोनोग्राफी केल्यावर तिच्या गर्भाशयाजवळ गाठ असल्याचे निदर्शनास आले. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यास तत्परता दाखवली. रुग्णाच्या पोटात असलेली गाठ गंभीर स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आणून दिले. ही गाठ पोटातील मोठ्या रक्तवाहिन्यांच्या जवळ असल्याने आणि रक्तवाहिन्यामध्येही गुठळ्या असल्याने तसेच कर्करोग असण्याची शक्यता लक्षात घेता ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची व जोखमीची होती.

संपूर्ण परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना गाठ काढण्याची विनंती केली व त्यासाठी संमती दिली. या अत्यंत गुंतागुंतीच्या ऑपरेशनमध्ये प्रसिद्ध कर्करोग सर्जन यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ञ डॉ. अक्षय ढमढेरे, डॉ. नितीन शिरोळे, डॉ. राजेश आखाडे, डॉ. परिमल परदेशी तसेच प्राईमप्लस हॉस्पिटलच्या डॉक्टर व नर्सिंग स्टाफने जवळपास दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान साडेतीन किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली. डॉक्टरांनी ही जबाबदारी स्वीकारून अत्यंत कौशल्याने व काळजीपूर्वक शस्त्रक्रिया पार पाडली.

 

दरम्यान, या शस्त्रक्रियेमध्ये तब्बल  24x 15 सें.मी. आकाराची व तीन किलो वजनाची गाठ काढण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे ग्रामीण भागातही प्राईमप्लस हॉस्पिटल मधील आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून, वेळेत उपचार झाल्यास जीव वाचवणे शक्य आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.

दरम्यान, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर समाधान व्यक्त करताना विशेष कर्करोग तज्ञ म्हणाले की, “प्राईमप्लस हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या टीमच्या समन्वयामुळे अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही ग्रामीण भागात शक्य होत आहेत, हे अत्यंत आनंदाचे व प्रेरणादायी आहे.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Jhund Actor Murder: 'झुंड' मधील प्रसिद्ध अभिनेत्याची मित्रानेच केली निर्घृण हत्या; वायरनं बांधलं, चाकूने केले सपासप वार अन् नंतर केलं भयंकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.