Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 2 September 2026, 14:53

यवत (पुणे) : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात यवत (ता. दौंड) येथे ओबीसी समाज आक्रमक झाला. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली यवत चौकात शासन निर्णयाची होळी करून जोरदार निषेध नोंदविण्यात आला. आंदोलकांच्या मोठ्या गर्दीमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी पाटस टोल नाका ते मुंबई महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने यवत चौकात जमले होते.

आंदोलकांनी शासन निर्णयाची होळी करत ‘आरक्षण वाचवा, ओबीसी वाचवा’, ‘ओबीसींच्या हक्कावर गदा सहन केली जाणार नाही’, ‘आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी मैदानात’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शासनाने संबंधित निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

‘संविधान मानायचे की गॅझेट?’
यावेळी प्रा. लक्ष्मण हाके यांनी शासनावर जोरदार टीका केली. “जीआरला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्याचे औचित्य साधून शासन निर्णयाची होळी करण्यात आली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मानायचे की हैदराबादचे गॅझेट मानायचे, याचा विचार केला पाहिजे,” असे हाके म्हणाले.

 

लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांकडून कुणबी दाखले घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी त्यांच्या मुलांना व नातेवाईकांना कुणबीचे दाखले काढून घेतले आहेत. त्यामुळे मागासवर्गीय ओबीसींच्या संधी हिरावल्या जात आहेत,” असा दावा हाके यांनी केला.

महामार्गावर वाहनांच्या रांगा
आंदोलनामुळे यवत चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांची गर्दी आणि घोषणाबाजीमुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शासनाच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आरक्षणाचा संघर्ष पुन्हा एकदा रस्त्यावर आला असून, यवतच्या आंदोलनाने या संघर्षाची तीव्रता अधोरेखित केली आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38

हडपसरमध्ये तरुणावर चौघांचा हल्ला! वाद मिटवायला बोलावलं अन् कोयत्याने पाठीवर वार केला

Wednesday, 2 September 2026, 17:19
Next Post

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! 'कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही' कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp