Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 2 September 2026, 17:39

नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महिला आरक्षण, पेपरफुटी, कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध आहे, असे कोण सांगत आहे, असा सवाल त्यांनी केला. 2023 मध्ये काँग्रेसने महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती विधेयक आणले होते. त्यामुळे महिला आरक्षणाची सुरुवात करणारे आम्हीच आहोत, असा दावा चव्हाण यांनी केला.

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही प्रश्न उपस्थित केला. आरएसएस एखाद्या महिलेला संघचालकाचे पद देणार का, असा सवाल त्यांनी केला.

राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरतीतील पेपरफुटीच्या घटनांवरही चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. वारंवार पेपर फुटत आहेत आणि या प्रकरणांमध्ये सत्ताधारी पक्षातील मोठ्या नेत्यांची नावे समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला. पेपर कोट्यवधी रुपयांना विकले जात असल्याचे सांगत या प्रकाराची गंभीर दखल घेऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, काँग्रेसच्या 10 दिवसांच्या शिबिराच्या समारोपासाठी राहुल गांधी नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत कुंभमेळा, शक्तिपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप होत असून, या विषयावर केंद्र सरकारसमोर आवाज उठवण्याची भूमिका राहुल गांधी यांनी मांडल्याची माहिती दिली. शक्तिपीठ महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात कमिशन घेतले जात असल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला.

राज्यातील खराब रस्ते आणि खड्ड्यांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल अद्याप स्पष्ट नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता काही ठराविक लोकांना कंत्राटे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिबिरात सहभागी होऊन राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38

हडपसरमध्ये तरुणावर चौघांचा हल्ला! वाद मिटवायला बोलावलं अन् कोयत्याने पाठीवर वार केला

Wednesday, 2 September 2026, 17:19

पीएमआरडीएचे 9 कोटी रुपये गेले मातीत; उरुळी कांचन-प्रयागधाम रस्त्यावर 4 फूट मातीचा राडारोडा, अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी..

Wednesday, 2 September 2026, 17:16
Next Post

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp