Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 2 September 2026, 18:33

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पुणे बाह्य रिंगरोडच्या कामाला वेग आला आहे. पश्चिम टप्प्यातील ६९ किलोमीटरच्या मार्गाचे आतापर्यंत सुमारे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत हे काम ६५ टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. हा सहा ते आठ पदरी मार्ग डिसेंबर २०२७ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

पुणे परिसरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सुमारे १७० किलोमीटर लांबीचा बाह्य रिंगरोड तयार केला जात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ५२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. हा रिंगरोड पुणे परिसरातील नऊ राष्ट्रीय महामार्गांना जोडणार असल्याने शहरातून जाणाऱ्या अवजड आणि लांब पल्ल्याच्या वाहनांना मोठा पर्यायी मार्ग मिळणार आहे.

पश्चिम टप्प्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी त्याचे पाच भाग करण्यात आले असून, सर्व भागांमध्ये एकाचवेळी बांधकाम सुरू आहे. या कामाची सरासरी प्रगती ३० टक्क्यांवर पोहोचली आहे. पावसाळ्यातही काम सुरू ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या रिंगरोडमध्ये खडकवासला धरणाच्या जलाशयावर ६४० मीटर लांबीचा मोठा पूल उभारला जात आहे. या पुलाचे खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, ऑगस्ट २०२७ पर्यंत पूल पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

 

सिंहगड किल्ल्याच्या मागील बाजूस ५.८ किलोमीटर लांबीचा बोगदाही तयार केला जात आहे. या बोगद्याचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑक्टोबरपर्यंत बोगद्याचे खोदकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी दर ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेजची व्यवस्था करण्यात आली आहे.

पश्चिम रिंगरोड शिवरेपासून सुरू होऊन सिंहगडामागील बोगदा, खडकवासला जलाशयावरील पूल आणि हिंजवडीच्या पुढे पौड रस्ता ओलांडत उर्से येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होऊन अवजड वाहनांना शहराबाहेरून प्रवास करता येणार आहे.

पश्चिम टप्प्यानंतर रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24
Next Post

'ओल्ड मंक' प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp