Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 September 2026, 19:49

पुणे : तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि ‘फुले-गवत’ हे मूळ निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतरिम निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला या वादावर अंतिम निर्णय घेण्यासाठी नक्की किती वेळ लागेल, याची स्पष्ट टाइमलाइन सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील डी. एस. नायडू यांना खंडपीठाने स्पष्ट केले की, अशा स्वरूपाचे राजकीय वाद दीर्घकाळ प्रलंबित राहणे योग्य नाही. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाच्या वादाचा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले की, दोन्ही गटांना आपले पुरावे व दावे मांडण्याची पुरेशी संधी देऊन या प्रकरणाचा निकाल जलदगतीने लावावा. आवश्यक असल्यास आयोगाने दररोज सुनावणी घेऊन हा निर्णय घ्यावा.

ममता बॅनर्जी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. जुलै महिन्यातच घेण्यासारखा हा निर्णय निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. ऐन निवडणुकीच्या काळात चिन्ह गोठवल्याने पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांत 6 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही गटांनी मूळ नाव व चिन्हावर दावा केल्याने निवडणूक आयोगाने 17 सप्टेंबर रोजी मूळ चिन्ह व नाव गोठवले. या निवडणुकीपुरती अंतरिम व्यवस्था म्हणून ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ हे चिन्ह दिले आहे, तर दुसऱ्या गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ नाव आणि ‘लिफाफा’ हे चिन्ह वाटप करण्यात आले आहे.

 

आता निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात काय टाइमलाइन सादर करतो आणि या प्रकरणाचा अंतिम निकाल कधी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पुन्हा अटक; दिल्लीत नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 8:07

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज उन्हाचा तडाखा, 35 अंशांपर्यंत तापमानाचा अंदाज; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Saturday, 17 October 2026, 8:00

Daily Horoscope: कुणाची होणार चांदी, कुणाच्या अडचणी वाढणार? 17 ऑक्टोबरचं राशिभविष्य वाचाच

Saturday, 17 October 2026, 7:44

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54
Next Post

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? 'कृती समिती' आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp