Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण येथे जमिनीच्या वादातून कुटुंबावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 4 June 2026, 12:54

भिगवण, (पुणे) : जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर कोयता, लोखंडी पाईप आणि गजाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत महिलेचा विनयभंग करून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आल्याची घटना घडली. अकोले (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील शेत जमीन गट नंबर ४१४ येथे बुधवारी (ता. 27) सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पवारवस्ती (पोंधवडी) येथील 7 जणांच्या विरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सतीश रामदास आवाड (वय 40, धंदा-शेती, रा. वायसेवाडी, ता. इंदापूर) यांनी याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लखन राजेंद्र दराडे, गणेश वामन दराडे, राजेंद्र श्रीहर दराडे, संजय श्रीहर दराडे, शुभम बाळासो दराडे, विलास आत्माराम दराडे, सार्थक संजय दराडे (सर्व रा. पवारवस्ती, पोंधवडी, इंदापूर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश आवाड बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास कुटुंबासहित शेत जमीन गट नंबर ४१४ मधील आपल्या मालकीच्या शेतात उन्हाळी मशागतीचे काम करत होते. ते शेतातील दगड-धोंडे गोळा करून बाहेर टाकत असतानाच, वरील आरोपी हातामध्ये धारदार कोयते, लोखंडी गज, लोखंडी पाईप आणि लाकडी काठ्या घेऊन मोटारसायकलवरून शेतात घुसले.

या आरोपींनी आवाड कुटुंबाला अश्लील शिवीगाळ सुरू केली. काही समजण्याच्या आतच, आरोपींनी सतीश आवाड यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने थेट प्रहार केला. यावेळी सतीश यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले व ते जमिनीवर कोसळले. सतीश यांना वाचवण्यासाठी त्यांचे वडील आणि भाऊ धावले असता, आरोपींनी त्यांनाही जमिनीवर पाडून लोखंडी गजाने, लाकडी काठ्यांनी आणि दगडांनी बेदम मारहाण केली.

फिर्यादी सतीश यांची पत्नी या पतीला वाचवण्यासाठी पुढे आले असता, आरोपींनी त्यांचा विनयभंग केला. तसेच भावजय ही मदतीसाठी ओरडत असताना तिला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत सतीश आवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील आरोपींवर विविध कलमान्वये भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एंट्री! पुण्यासह 26 जिल्ह्यांवर पावसाचे सावट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 4 June 2026, 22:21

धक्कादायक! आईच्या बॉयफ्रेंडकडून 4 वर्षाच्या लेकराची निर्घृण हत्या; बेदम मारहाण करून मृतदेह नाल्यात फेकला अन्…

Thursday, 4 June 2026, 21:41

वेष बदलला, नाव बदलले, दाढी, केस वाढवले तरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला! अटकेनंतर सचिन घायवळचा पहिला फोटो समोर…

Thursday, 4 June 2026, 20:57

भोरचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे 93व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Thursday, 4 June 2026, 20:21

18 बळी घेणारा दारू अड्डा जमीनदोस्त! फुगेवाडीत प्रशासनाचा हातोडा; कारवाईला वेग

Thursday, 4 June 2026, 20:17

जुन्नरमध्ये सुरू होता बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाची मोठी धाड; 4 लाखांचे बनावट मद्य जप्त

Thursday, 4 June 2026, 19:39
Next Post

उरुळी कांचन विषारी दारू प्रकरणी प्रजापती तुरुंगात, पण त्याचे उजवे-डावे दोन ‘आका’अजूनही मोकाट?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.