Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन विषारी दारू प्रकरणी प्रजापती तुरुंगात, पण त्याचे उजवे-डावे दोन ‘आका’अजूनही मोकाट?

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 June 2026, 13:08

लोणी काळभोर, ता. ४ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणामुळे २२ हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भीषण दुर्घटनेनंतर पोलिसांनी उरुळी कांचन येथील राजू (राधेलाल) प्रजापती याला अटक केली, तर त्याच्याशी आर्थिक संबंध उघड झाल्याने चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या संपूर्ण प्रकरणातील प्रजापतीचे उजवे-डावे दोन ‘आका’ अजूनही कायद्याच्या कचाट्यात आले नसल्याने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, प्रजापतीला अटक झाली, पण अनेक वर्षांपासून हातभट्टी दारूच्या अवैध व्यवसायातून कोट्यवधींची माया गोळा करणारे आणि ऐषआरामाचे जीवन जगणारे कथित ‘मोठे मासे’ नेमके कुठे आहेत? त्यांच्यापर्यंत तपासाची साखळी का पोहोचत नाही? की त्यांना जाणीवपूर्वक संरक्षण दिले जात आहे? अशी चर्चा सध्या स्थानिक नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

उरुळी कांचन परिसरात हातभट्टी दारूचा व्यवसाय काही दिवसांचा नसून अनेक वर्षांपासून खुलेआम सुरू असल्याचे बोलले जात आहे. दादाने अवैध धंद्यांतून कमावलेल्या काळ्या पैशातून आलिशान थार , मालमत्ता आणि मोठे आर्थिक साम्राज्य उभे राहिल्याची चर्चा आहे. उरुळी कांचनमध्ये हातभट्टी दारूचा अक्षरशः ‘लोंढा’ वाहत असताना स्थानिक यंत्रणा नेमकी काय करत होती, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. या प्रकरणात केवळ एका व्यक्तीवर कारवाई करून तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे. कारण मृतांचा आकडा वाढत असताना आणि संपूर्ण राज्य हादरलेले असताना, या साखळीमागील मोठ्या नावांवर अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नाही.

 

या प्रकरणात उरुळी कांचन, यवत आणि दौंड येथील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच उरुळी कांचनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. मात्र, एवढ्यावरच जबाबदारी संपते का? अनेक वर्षे सुरू असलेल्या अवैध धंद्यांना संरक्षण कोणी दिले, त्यातून कोणाचा फायदा झाला आणि स्थानिक पातळीवरील साखळी किती खोलवर रुजली आहे, याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

विषारी दारू प्रकरणानंतरही परिसरातील अवैध धंद्यांवर पूर्णपणे लगाम लागलेला नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हातभट्टी, मटका आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांविषयी गावात उघडपणे चर्चा होत आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नसल्याचे चित्र दिसत आहे.आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, प्रजापतीनंतर पुढचा क्रमांक कोणाचा? आणि ‘मोठे मासे’ खरोखरच कायद्याच्या जाळ्यात अडकणार की पुन्हा एकदा पडद्यामागेच राहणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नव्या वरिष्ठ निरीक्षकांसमोर मोठे आव्हान

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी विजयमाला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या खांद्यावर आता केवळ विषारी दारू प्रकरणाचा सखोल तपासच नाही, तर परिसरातील अवैध धंद्यांचे कथित जाळे उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान आहे. २२ हून अधिक जीव गेलेल्या या प्रकरणात केवळ लहान-मोठ्या कारवायांनी जनतेचे समाधान होणार नाही. या मृत्यूंसाठी जबाबदार असलेली संपूर्ण साखळी उघड झाली पाहिजे आणि कितीही प्रभावशाली असले तरी संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून खलबतं! बैठकीत मोठा निर्णय, ठोंबरेंना डावलून पुण्यातल्या ‘या’ महिला नेत्याची नियुक्ती…

Wednesday, 17 June 2026, 15:01
Operation Tiger: Rebel MPs were taken to an undisclosed location; Amit Shah made a single phone call, giving the green signal to 'Operation Tiger'—what exactly happened?

Operation Tiger: बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी नेलं, अमित शहांनी एक फोन केला अन् ऑपरेशन टायगरला ग्रिन सिग्नल मिळाला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 17 June 2026, 14:29

बिग बॉस 20 मध्ये असणार आसिम रियाज, शहनाज गिल ते उर्फी जावेद; संभाव्य स्पर्धकांच्या यादीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Wednesday, 17 June 2026, 13:42

लोणी काळभोर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 34 प्रकरणांमध्ये सरकारी जमिनींचा गैरवापर; तब्बल 194 कोटींच्या जमिनी सरकारजमा

Wednesday, 17 June 2026, 13:07

लोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांची अचानक धाड; मालकासह 18 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 17 June 2026, 13:03

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा कापलेला पाय मावशीच्या दाराला टांगला; घटनेने परिसरात खळबळ

Wednesday, 17 June 2026, 12:05
Next Post

शिरसगाव काटा येथे 350 किलो खवा रस्त्याच्या कडेला फेकला; भेसळविरोधी कारवाईच्या धास्तीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.