Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 34 प्रकरणांमध्ये सरकारी जमिनींचा गैरवापर; तब्बल 194 कोटींच्या जमिनी सरकारजमा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 17 June 2026, 13:07

लोणी काळभोर, ता. १७ : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासह विविध भागांमध्ये सरकारी जमिनींच्या गैरवापराविरोधात जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल ३४ प्रकरणांतील सुमारे १९४ कोटी रुपये मूल्याच्या सरकारी जमिनी सरकारजमा केल्या आहेत. या धडक कारवाईमुळे भूमाफिया आणि शासकीय जमिनींचा अटींचा भंग करून वापर करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध संस्था आणि व्यक्तींना विशिष्ट अटी व शर्तींवर ‘वर्ग-दोन’ स्वरूपात देण्यात आलेल्या सरकारी जमिनींचा वापर मूळ उद्देशासाठी होत आहे की नाही, याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील २२० प्रकरणांची सखोल छाननी केली.

या तपासणीत ३४ प्रकरणांमध्ये स्पष्टपणे शर्तभंग झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जमिनी तातडीने शासनाच्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारजमा करण्यात आलेल्या जमिनींची एकूण किंमत १९३ कोटी ९६ लाख रुपये इतकी असल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली. या मोहिमेत पुणे शहरात सर्वाधिक १३ प्रकरणांमध्ये थेट कारवाई करण्यात आली. तसेच लोणी काळभोर, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील काही महत्त्वाच्या जमिनींचाही या कारवाईत समावेश आहे.

 

गेल्या वर्षी मुंढवा आणि ताथवडे परिसरातील सरकारी जमिनींच्या संशयास्पद खरेदी-विक्रीचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य शासनाने नियुक्त केलेल्या खारगे समितीने सखोल चौकशी केली होती. या समितीने सरकारी जमिनींची मालकी अबाधित ठेवण्याबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व सरकारी जमिनींच्या नोंदी आणि वापराची पडताळणी करण्याचे आदेश दिले.

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन जिल्हाभरातील सरकारी जमिनींची प्रत्यक्ष पाहणी आणि वापराची तपासणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुमारे २,१०० प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १६ महसूल कार्यालयांपैकी ११ कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारची प्रकरणे उघडकीस आली आहेत. मात्र, बारामती, हवेली, शिरूर, वेल्हे आणि दौंड तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत अद्याप शर्तभंगाचे एकही प्रकरण समोर आलेले नाही.

दरम्यान, सरकारी जमिनींचा अटींचा भंग करून व्यावसायिक अथवा अन्य कारणांसाठी गैरवापर करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि भविष्यातही अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

बिग बॉस 20 मध्ये असणार आसिम रियाज, शहनाज गिल ते उर्फी जावेद; संभाव्य स्पर्धकांच्या यादीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.