Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून खलबतं! बैठकीत मोठा निर्णय, ठोंबरेंना डावलून पुण्यातल्या ‘या’ महिला नेत्याची नियुक्ती…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 June 2026, 15:01

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी अखेर पुण्याच्या वैशाली नागवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षपदासह संघटनेतील विविध रिक्त पदांवर नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यात आली.

भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असताना पुण्यातील राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या देखील इच्छुक असल्याचे बोलले जात होते. मात्र, पक्ष नेतृत्वाने ठोंबरे यांना संधी न देता वैशाली नागवडे यांच्यावर विश्वास दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे यांच्या नावावरही सहमती झाल्याचे समजते.

वैशाली नागवडे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. दौंड तालुक्यातील सक्रिय आणि संघर्षशील नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवून पक्षाने पुणे जिल्ह्यालाच पुन्हा एकदा महत्त्वाचे प्रतिनिधित्व दिल्याचे मानले जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

संजय देशमुख 'कॅप्टन', तर आष्टीकर 'व्हाइस कॅप्टन'; ओमराजेंना 'त्या' हत्या प्रकरणातील निकालाचे आश्वासन? सुषमा अंधारेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.