पुणे : Pune Crime – पुणे शहरातील पाषाण येथून संतापजनक बातमी समोर आली आहे. चिकन सेंटरवर चिकन आणण्यासाठी गेलेल्या (Pune Crime) अल्पवयीन मुलीला ४५ वर्षीय चिकन सेंटर चालकाने दोनशे रुपये देतो अशी बतावणी करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime) या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. (Pune Crime)
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात पिडित मुलीच्या आईचे फिर्याद दिली आहे. त्यावरून चिकन सेंटर मालक ईरशाद अन्सारी (वय ४५) याच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी चिकन आणण्यासाठी आरोपी ईरशाद अन्सारी यांच्याकडे गेली होती. त्यावेळी अन्सारी याने मुलीली दुकानाच्या आत बोलावले व तिला दोनशे रुपये देतो असे म्हणत तिच्याशी लैगिंक चाळे केले. मुलीने घडलेला हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर चिकन सेंटर चालकाचे हे संतापजनक कृत्य समोर आले. पुढिल तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा:
Pune Crime : शस्त्राचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…!
Hadapsar Crime : हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक…!