Pune Crime | पुणे : पुणे शहरातून एक अजब बातमी समोर आली आहे. एका पाळीव श्वानाने रस्त्यावर केलेल्या विष्ठेवरून वाद झाला . या वादातून एका तीस वर्षीय महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार शहरातील वानवडी येथील आझाद नगर येथे 6 एप्रिल रोजी घडला आहे.
याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर माणगावकर, दोन महिला आणि एका अनोळखी पुरुषावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्ठा साफ करावी यासाठी वाद…
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ह्या पहाटे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पाळीव श्वानाला घेऊन रस्त्याने जात होत्या. यावेळी त्यांच्या श्वानाने भर रस्त्यात विष्ठा केली. ही विष्ठा साफ करावी यासाठी आरोपींनी तक्रारदार महिला यांच्यासोबत वाद घातला व शिवीगाळ केली.
तक्रारदार या संपूर्ण घटनेचे मोबाईल मध्ये फोटो काढत असताना आरोपीने त्यांच्या हातातील फोन जबरदस्तीने काढून घेत त्यांचा हात मुरगाळला आणि इतर आरोपींना बोलावून घेत कपडे फाडून त्यांना रक्त येईपर्यंत मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune : मुलीचा पहिला स्मृतीदिन ! वडिलांनी जनता वसाहतीतील मुलींना खाऊ घातले हापूस आंबे
Pune Crime | शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; वानवडीतील प्रकार