Thursday, June 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महानगरपालिकेसाठी आज मतदान, तर उद्या निकाल; पोलीस प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 15 January 2026, 6:00

संतोष मुंडे 

पुणे ता.14: राज्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पुणे महापालिकेसाठी आज (15 जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार असून सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पुणेकरांना मतदान करता येणार आहे. मतमोजणी शुक्रवारी (16 जानेवारी) रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुणे शहरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यातच मुख्य लढत रंगणार असल्याचे दिसून येत आहे. यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.

 

यावेळी महापालिकेचे 165 नगरसेवक निवडणूकीच्या रिंगणात होते. मात्र,  यातील दोन जागा बिनविरोध झाल्याने 163 नगरसेवकांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे. आज पुण्यातील सुमारे 35 लाख मतदार आपल्या प्रभागांचे प्रतिनिधी निवडणार असून, मतदार राजा आपले मत कुणाच्या पारड्यात टाकतो याकडे पुणेकरांचे लक्ष लागुण आहे.

पुणे महापालिका हद्दीत एकूण 4,011 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.  येथे 35 लाख 1,854 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी मतदान केंद्रांची पाहणी, नियोजन आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आजच्या मतदान प्रक्रियेसाठी 25,899  कर्मचारी,  454 क्षेत्रीय अधिकारी,  32 नोडल अधिकारी, 2,400 नोडल अधिनस्त कर्मचारी तसेच सुमारे 1,200 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी 1,062   कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे दिसून येत आहे. थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यात मर्यादा येत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारावर उमेदवारांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान,  पुणे महापालिका निवडणुकांसाठी प्रशासनासह पुणे पोलिसही पूर्णपणे सज्ज झाले आहेत. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी 12 हजारांहून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी ते पोलिस अंमलदार असा मोठा फौजफाटा रस्त्यावर तैनात असणार आहे.

कोट

“ आज होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. संवेदनशील तसेच महत्त्वाच्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.” 

– पोलिस आयुक्त अमितेश कुमार 

शहरात चारस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून प्रत्येक बुथवर पोलिस अंमलदार, होमगार्ड आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त असेल. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे पथक कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी विभागून घेण्यासाठी शहरात  454 झोन करण्यात आले असून त्या-त्या भागात वरिष्ठ निरीक्षक व सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग केले जाणार आहे.

शहरातील  3,983 बुथ केंद्रांवर मतदान होणार असून 913 इमारतींमध्ये ही प्रक्रिया पार पडेल. 90 संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आठ क्यूआरटी पथके, चार एसआरपीएफ कंपन्या, मोबाइल पेट्रोलिंग पथके तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे स्ट्रायकिंग फोर्स सतर्क ठेवण्यात आले आहेत.  समाज माध्यमावरील प्रचारावरही निवडणूक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा बारकाईने नजर ठेवून आहे.

मतदार ओळखीसाठी ग्राह्य कागदपत्रे

मतदानाच्या वेळी मतदार ओळखपत्रासह पुढील कागदपत्रे ओळख म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत.

भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, वाहनचालक परवाना, आयकर विभागाचे ओळखपत्र, केंद्र किंवा राज्य शासनाने दिलेले फोटो ओळखपत्र, बँक अथवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र, मनरेगा फोटो ओळखपत्र, निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे, लोकसभा किंवा विधानसभेचे अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र तसेच केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा कार्ड हे ओळखपत्र घेऊन मतदारांनी आपले मत करण्यासाठी मतदान केंद्रावर जावे.

एकूणच, पुणे महानगरपालिका निवडणूक पारदर्शक, शांततापूर्ण आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून आजचा मतदानाचा दिवस शहराच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची धास्ती! पोलिसांचा ‘डिजिटल पहारा’; 21 कॅमेऱ्यांमधून ठेवणार हालचालींवर लक्ष

Wednesday, 10 June 2026, 22:59

सांगली पालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 90 दिवसांपासून गायब असलेल्या 37 कर्मचाऱ्यांचे निलंबन; आयुक्तांच्या धडक कारवाईने खळबळ

Wednesday, 10 June 2026, 22:24

काळाचा क्रूर घाला! मामाच्या गावी निघालेली भावंडं घरी परतलीच नाहीत; एकाच अपघातात तिन्ही भावंडांचा बळी

Wednesday, 10 June 2026, 21:42

नवले पुलाखाली भीषण अपघात! भरधाव सिमेंट टँकर उलटून डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

Wednesday, 10 June 2026, 21:00

पुण्यात साडेचौदा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिला! पती आणि नातेवाईकांविरोधात खराडी पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 10 June 2026, 20:18

“मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं”; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी ‘मस्करी’? ‘त्या’ एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

Wednesday, 10 June 2026, 19:38
Next Post

Today's Horoscope: चंद्र-मंगळाची युती आणि 3 मोठे राजयोग; 'या' राशींना होणार लाभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.