हनुमंत चिकणे..
Uruli Kanchan News : उरुळी कांचन (पुणे) : ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ६६६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. Uruli Kanchan News
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बी. जी. शिर्के, बाल विकास मंदिर, महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय त या ठिकाणी रविवारी (ता. २३) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६४८ पुरुष व १८ महिलांचा समावेश होता. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास पर्यावरण झाडाचे रोप, प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
मागील आठ वर्षापासून हा ग्रुप उरुळी कांचनसह परिसरात संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांच्या सहभागाने ग्राम स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, ५ हजारावरून अधिक झाडे लावून, संवर्धन करण्याचे काम पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचे कार्य जोमाने करीत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसर व पालखी मार्ग स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. Uruli Kanchan News
दरम्यान, लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या तर्पण रक्तपेढी, बी.जे. मेडिकल ससून, आधार ब्लड बँक धनकवडी यांच्या समवेत ग्रुपने सलग सात वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करून १३५२ रक्त पिशवी संकलन केले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाच्या काळात मार्च २०२० ते मे २०२१ बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय आणि ग्रूपच्या वतीने चार वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सुमारे ५५६ रक्त पिशवीचे संकलन करून आरोग्यक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. Uruli Kanchan News