Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tehsildar Suryakant Yewale: पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवलेंचा मोठा दावा; म्हणाले…

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 6 November 2025, 17:41
Tehsildar Suryakant Yewale: Tehsildar Suryakant Yewale's big claim in Parth Pawar's land scam case; said...

Tehsildar Suryakant Yewale: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार (Pune Parth Pawar Land Scam) प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी महसूल विभागाने तातडीने कारवाई करत पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित केले आहे. यापूर्वी  20 ऑक्टोबरलाच निलंबनाचा प्रस्ताव महसूल विभागाकडे गेला होता, मात्र प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर अखेर कारवाईचे आदेश जारी करण्यात आले.

 

 बळीचा बकरा बनवले जात आहे?

निलंबनाची कारवाई झाल्यानंतर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, या जमीन व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचा आणि कोणतीही फाईल आपल्याकडे आली नसल्याचा मोठा दावा केला आहे.

 “पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ती फाईल माझ्याकडे आलीच नाही, अगदी जमीन व्यवहाराचा दस्तही मी पाहिलेला नाही. व्यवहाराला आमच्याकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर कोणत्या कारणाने कारवाई केली, हे देखील मला माहिती नाही.”

  – सूर्यकांत येवले, निलंबित तहसीलदार 

येवले यांनी या प्रकरणात जमीन व्यवहाराला कोणी परवानगी दिली, कोणत्या विभागाने दिली, याचीही कल्पना नसल्याचे सांगितले. हा जमीन खरेदीचा व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अखत्यारीतील विषय असल्याने महसूल विभागाकडून ही कारवाई का झाली, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

वरिष्ठांकडून कोणतीही विचारणा नाही

‘महार वतनाच्या’ जमिनीचा हा व्यवहार अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी पातळीवरच होऊ शकतो. त्यामुळे ‘बड्या धेंडांना वाचवण्यासाठी तुम्हाला बळीचा बकरा बनवले जात आहे का?’ या प्रश्नावर येवले यांनी थेट बोलणे टाळले. त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे किंवा अन्य कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी आपल्याकडून कोणतीही माहिती मागवली नसल्याचे स्पष्ट केले. निलंबनाचा आदेश मिळाल्यावर अधिक बाबी स्पष्ट होतील, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणात पुणे शहरचे दुय्यम निबंधक  रवींद्र तारू यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या; पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची धडक कारवाई..

Wednesday, 1 April 2026, 10:40

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Wednesday, 1 April 2026, 10:33

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13
Next Post
Parth Pawar: Big update in Parth Pawar's land purchase case; Stamp Duty Department notice to Amedia company

Parth Pawar: पार्थ पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणात मोठी अपडेट; अमिडिया कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.