पुणे : पुण्यातीलनामांकित ‘बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय’ येथे वैद्यकीय शिक्षणाचे प्रथम वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे.

तन्मय अजयकुमार वंगे असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो शनिवारी (ता. 18) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपला मोबाईल बंद करून अचानक गायब झाला आहे.मोबाईल बंद होण्यापूर्वी तन्मयचे शेवटचे ‘लास्ट लोकेशन’ सोलापूर-पुणे महामार्गावर उरुळी कांचन परिसराच्या आसपास दाखवत आहे.

मिळालेल्या कडक माहितीनुसार, तन्मय वंगे हा शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक कुणालाही काही न सांगता निघून गेला. त्यानंतर नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा मोबाईल बंद येत होता. त्याच्या अशा अचानक बेपत्ता होण्यामुळे त्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि ससून रुग्णालयातील डॉक्टर मित्र अत्यंत घाबरलेले असून, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, तन्मयचे वय -19 वर्षे (अंदाजे) असून उंची 5 फूट 7 इंच आहे, बांधा – सडपातळ, रंग : सावळा, चष्मा घातालेला आहे शेवटचे कपडे : तपशील माहित नाही. सदर फोटो किंवा वर्णनाचा तरुण आपल्या आसपास कुठेही दिसून आल्यास अथवा याविषयी काहीही माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी अथवा अजयकुमर वंगे (वडील) – 9975070549, संतोष फुलसे (काका) – 9158000177, विश्वजीत मदे (काका) – 8087152403 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.







