Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 22:26

पुणे: पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे भररस्त्यात वाईन्स शॉपच्या कॅशिअरला लक्ष्य करत तब्बल ८ लाख रुपयांहून अधिक रकमेची धाडसी लूट झाल्याची घटना समोर आली आहे. चार अज्ञात दरोडेखोरांनी कॅशिअरच्या डोळ्यात अज्ञात स्प्रे मारून त्यांच्याकडील रोकड आणि दुचाकी लुटून पलायन केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी हौसकुमार प्रकाश इंगळे (वय ४२, रा. नऱ्हे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते नऱ्हे येथील ‘डीएसपी वाईन्स’मध्ये कॅशिअर म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री सुमारे १०.५५ वाजता दुकान बंद केल्यानंतर त्यांनी दिवसभराच्या विक्रीतून जमा झालेली ७ लाख ७६ हजार ४८० रुपयांची रोकड पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवून ती आपल्या होंडा ॲक्टिव्हाच्या डिकीत ठेवली होती. ही रक्कम दुकानमालकांकडे जमा करण्यासाठी ते डांगे चौकाच्या दिशेने निघाले होते.

इंगळे हे वडगाव बुद्रुक येथील प्रयेजा सिटीजवळील सर्व्हिस रोडवरून वारजेच्या दिशेने जात असताना दोन मोटारसायकलींवर आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. काही क्षणांतच आरोपींनी त्यांच्या डोळ्यात अज्ञात स्प्रे फवारला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इंगळे यांना काहीच दिसेनासे झाले आणि त्यांची प्रतिकार करण्याची क्षमता कमी झाली.

 

याच संधीचा फायदा घेत आरोपींनी इंगळे यांना धमकावत त्यांच्या ताब्यातील होंडा ॲक्टिव्हा मोपेडसह त्यामध्ये ठेवलेली रोकड लुटून घटनास्थळावरून पलायन केले. लुटलेल्या मुद्देमालामध्ये ७ लाख ७६ हजार ४८० रुपयांची रोकड आणि सुमारे ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ८ लाख ६ हजार ४८० रुपयांचा ऐवज आहे.

घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून या धाडसी दरोड्यामागे कोणाचे नियोजन होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.