Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 21:09

पुणे: पुण्याला देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान शहरांच्या रांगेत उभे करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. बंगळुरू आणि हैदराबादच्या धर्तीवर पुण्याचा ‘ग्रोथ अँड इनोव्हेशन हब’ म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जाणार असून, राज्य शासनाने त्याची ‘हाय इम्पॅक्ट इनिशिएटिव्ह’ अर्थात समाज आणि अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम करणारा प्रकल्प म्हणून निवड केली आहे.

या प्रकल्पाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी 15 जुलै रोजी पीएमआरडीएमध्ये विविध विभागांची बैठक पार पडली. या बैठकीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए तसेच उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आगामी काळात या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती दिली जाणार आहे.

पुणे इनोव्हेशन हब अंतर्गत वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांची कमतरता आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, आवश्यक जागांचा अभ्यास, भविष्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचे नियोजन आणि स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या नियोजनासाठी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राज्य सरकारचा उद्देश पुण्याला केवळ आयटी शहर म्हणून नव्हे, तर जागतिक स्तरावरील इनोव्हेशन आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याचा आहे. त्यासाठी ‘ब्रँड पुणे’ची निर्मिती केली जाणार असून, देश-विदेशातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. याशिवाय बंगळुरूच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात टेक समिटचे आयोजन करण्याचाही प्रस्ताव आहे.

या उपक्रमामुळे पुण्यात गुंतवणूक वाढणे, नव्या उद्योगांना चालना मिळणे, उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी निर्माण होणे आणि शहराचा जागतिक तंत्रज्ञान नकाशावरील दर्जा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

"नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू..." अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp