Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे: राज्यात पावसाचा जोर कायम असून 29 जुलै रोजीही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने घाटमाथ्यासह राज्यातील 34 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता असून या सर्व भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत दिवसभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच नाशिक घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.

 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना सुरू असताना शेतात किंवा मोकळ्या जागेत जाणे टाळावे, झाडाखाली उभे राहू नये तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

MH-12 चा जमाना संपला! पहिल्याच दिवशी व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी; चॉइस नंबरसाठी ११०० हून अधिक अर्ज दाखल

Friday, 28 August 2026, 8:02

१७ वर्षांपूर्वीचा कारनामा अन् फसवून लग्न! शिल्पाला छळणाऱ्या गवारे कुटुंबाचा काळा इतिहास समोर; खून, पैसा, प्रॉपर्टी अन् ब्लॅकमेल

Friday, 28 August 2026, 7:30

आज पाऊस पडणार की कडाका वाढणार! हवामान विभागाने दिला इशारा; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, वाचा आजच्या हवामानाची ताजी अपडेट

Friday, 28 August 2026, 7:16

Daily Horoscope: रक्षाबंधनाला जुळून आलाय ‘हंस राजयोग’! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; वाचा आजचं तुमचं राशिभविष्य

Friday, 28 August 2026, 7:05

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

Thursday, 27 August 2026, 22:55

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू अन् स्वाईन फ्लूचा विळखा तीव्र; अवघ्या २५ दिवसांत नोंदवले गेले तब्बल २०५ रुग्ण

Thursday, 27 August 2026, 22:36
Next Post

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; 'ब्रँड पुणे'च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp