Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 Pune PMC News: महापालिकेला पहिल्या सव्वा दोन महिन्यांत १,४११ कोटींचे उत्पन्न; मिळकत कर वसुलीत चांगला प्रतिसाद

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 8 July 2025, 19:47

पुणे: पुणे महापालिकेच्या मिळकत कर वसुलीला यंदाही सुरुवातीच्या टप्प्यात चांगली वसुली झाली आहे. ७ जुलैच्या संध्याकाळपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १,४११ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या १,४१५ कोटींच्या वसुलीच्या तुलनेत यंदाची आकडेवारी जवळपास समान आहे.

महापालिकेने यंदा १ मेपासून मिळकत कराची बिले वाटप करण्यास सुरुवात केली होती. मात्र, ४० टक्के सवलतींची नोंद न झाल्याने बिल वाटपात एक महिन्याचा विलंब झाला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार, ३० जूनपर्यंत कर भरणाऱ्यांना ५ ते १० टक्के सवलत देण्यात आली होती. अखेरच्या दिवशी करदात्यांची मोठी गर्दी आणि ऑनलाइन प्रणालीवर ताण आल्याने सवलतीची मुदत ७ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती.

 

कर आकारणी विभागाचे प्रमुख अविनाश सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत ७,७५,१४० मिळकतधारकांनी एकूण १,४११ कोटींचा कर भरला. रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन व्यवहार सुरु राहणार असल्याने अंतिम रक्कम याहून अधिक होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी याच कालावधीत ७,७८,५१६ करदात्यांकडून १,४१५.६५ कोटी रुपये वसूल झाले होते. त्यावेळी मिळकत करामध्ये ४० टक्के सवलतीसह समाविष्ट गावांतील कर वसुली स्थगित होती. या पार्श्वभूमीवर यंदाची कामगिरी समाधानकारक असल्याचे सपकाळ यांनी नमूद केले.

सपकाळ यांनी सांगितले की, मिळकत कर वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून नव्याने नियुक्त झालेल्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात येत असून, नवीन मिळकतींची नोंदणी आणि कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

दुबार मिळकत कर प्रकरणे निकाली काढून वसुलीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. महापालिकेच्या अंदाजपत्रकीय उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी वेळेत कर भरणा करून कारवाई टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

Thursday, 7 May 2026, 11:08
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Uruli kanchan : शिंदवणे हद्दीत दोन दुचाकींचा अपघात, 5 महिन्यांच्या बाळासह 2 वर्षांचा चिमुकला स्थानिकांच्या तत्परतेने थोडक्यात बचावला..व्हिडीओ..

Thursday, 7 May 2026, 11:01
Next Post

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या सहापदरी व चौपदरी रस्त्यांचे काम होणार लवकरच सुरू...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.