Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News: स्वतःच्या अपहरणाचा बनाव; दोन लाखांची खंडणी मागणारा युवक जेरबंद 

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 25 February 2026, 13:09

पुणे: वडील आणि भावाकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा खोटा बनाव रचत दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 21 वर्षीय युवकाला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. मनीषकुमार जमनाप्रसाद द्विवेदी (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. (Pune Crime News)

12 वीमध्ये नापास झाल्यानंतर मनीषकुमार पुण्यात येऊन बाणेर परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. 9 फेब्रुवारी रोजी तो गावी येणार असल्याचे त्याने कुटुंबीयांना फोनवरून कळवले होते. मात्र त्याच रात्री त्याचा मोबाईल बंद लागल्याने संशय निर्माण झाला.

10 फेब्रुवारी 2026 रोजी त्याच्या मोबाईलवरून वडील आणि भावाला व्हॉट्सअॅपवर धमकीचा संदेश पाठवण्यात आला. “जर मुलाला जिवंत पाहायचे असेल तर सहा तासांत दोन लाख रुपयांची व्यवस्था करा; पोलिसांना कळविल्यास ठार मारू,” असा इशारावजा संदेश देण्यात आला होता. भावाच्या जीवाला धोका असल्याची भीती वाटल्याने त्याच्या भावाने तातडीने पुण्यात येऊन बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आणि पोलीस निरीक्षक अलका सरग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणासह सीसीटीव्ही फुटेज आणि प्रवासाची माहिती तपासण्यात आली. तपासादरम्यान मनीषकुमार शहरात एकटाच रिक्षाने फिरत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच म्हाळुंगे येथील एका सोसायटीत तो वारंवार मित्राकडे जात असल्याचेही आढळले.

 

पुढील तपासात तो अहमदाबादमार्गे प्रयागराजला गेल्याचे समोर आले. सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव यांच्या पथकाने प्रयागराज येथे जाऊन चौकशी केली असता तो बारावीचे उर्वरित पेपर देण्यासाठी दुसऱ्या गावात गेल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांच्या मदतीने त्याला पुण्यात आणण्यात आले.

दरम्यान, कुटुंबीयांनी त्याच्या खात्यावर 10 हजार रुपये आगाऊ रक्कम जमा केली होती. 23 फेब्रुवारी रोजी पुण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता मनीषकुमारने पैशांसाठीच अपहरणाचा बनाव केल्याची कबुली दिली. खोटी माहिती देऊन कुटुंबीयांकडून ऑनलाईन रक्कम उकळल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

Tuesday, 1 September 2026, 16:25

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03
Next Post

Crime News: आधी नोकरीचं आमिष, मग अमानुष छळ! अभिषेक कळमकर यांच्यावर तरुणीचे गंभीर आरोप; काय आहे संपूर्ण प्रकरण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp