Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 1 April 2026, 11:07

उरुळी कांचन, ता. 01 : परिसरातील तुपे वस्ती भागात घरफोडी किंवा चोरी करण्याच्या उद्देशाने शस्त्रांसह दबा धरून बसलेल्या एका सराईत गुन्हेगाराला उरुळी कांचन पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. ही कारवाई शुक्रवारी (ता. 20) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

विशाल कैलास साबळे (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर सनी अगरवाल (पूर्ण नाव माहिती नाही, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद चव्हाण यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 20) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शरद चव्हाण व सहाय्यक फौजदार दाभाडे हे सरकारी वाहनातून रात्रगस्त घालत होते. यावेळी साखरे पेट्रोल पंप आणि सदानंद बेकरीच्या पाठीमागे तुपे वस्ती रोडवर दोन संशयित इसम तोंडाला काळा रुमाल बांधून गोल्डन रंगाच्या ॲक्टिव्हा गाडीसह अंधारात थांबलेले दिसले.

 

पोलिसांनी गाडी थांबवून चौकशीसाठी पुढे जाताच दोन्ही आरोपींनी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव विशाल साबळे असल्याचे सांगितले. तर त्याचा साथीदार सनी अगरवाल अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाला.

अटक करण्यात आलेल्या विशाल साबळे याच्याकडून घरफोडीसाठी वापरली जाणारी लोखंडी कटावणी, धारदार स्क्रू ड्रायव्हर, चेहरा झाकण्यासाठी वापरलेला काळा रुमाल तसेच गोल्डन रंगाची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली. या गाडीला पुढे किंवा मागे नंबर प्लेट नव्हती. शस्त्रांसह तिथे थांबण्याबाबत विचारले असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो घरफोडीच्या उद्देशानेच तिथे थांबल्याची खात्री पटल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान, या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल साबळे आणि फरार सनी अगरवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार चोरमले करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील 'या' प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.