पुणे: पुण्याच्या कल्यानीनगर परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथे मुलींना पैशांचे आमिष दाखवुन वेश्याव्यवसायाकरीता प्रवृत्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमोल भाऊसाहेब तांबडे (वय 28 वर्ष, धंदा मॅनेजर, रा. मु.पो मांडवे ता, श्रीरामपुर जि, नगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5,7 व भारतीय न्याय संहिता कलम 143,3 (5)प्रमाणे येरवडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, स्प्रिंग ब्रुक लॉज, लेन क्र. 7 , कल्याणीनगर पुणे याठिकाणी लॉजमध्ये मुलींना ठेवुन आरोपी अमोल त्यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत होता. त्यातुन मिळालेल्या रक्कमेतुन स्वतःची उपजिवीका भागवित होता. माहिती मिळताच मिथुन सांवत, सहायक पोलिस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन पुणे यांनी घटनास्थळी पोहचले.
या प्रकरणी पोलिस अधिकारी रामेश्वर दशरथ नवले (वय 40 वर्ष धंदा- नोकरी येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर) यांनी फिर्याद दिली असता अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा 1956चे कलम ३, ४, ५, ७ व भारतीय न्याय संहिता कलम १४३,३(५), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 मार्च 2025 ला उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपी बंटी मो नंबर 9860735039 (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
यावेळी रोख रक्कम 7 हजार रुपये, 35 हजार रुपयांचे 3 मोबईल संच, 399 रुपयांचे 10 न वापरलेले कंडोमचे पाकीट असा एकूण 42 हजार 399 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलिस स्टेशन पुणे करत आहेत.