Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यासह पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसाठी काका पुतण्याचा हातात हात; इच्छुक आयाराम-गयारामांच्या कोलांट-उड्या सुरूच  

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 29 December 2025, 18:24

संतोष मुंडे 

पुणे:  राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी अजित पवार (गट) एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पुणे महानगरपालिकेसाठीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? याकडे पुणेकरांचे लक्ष लागून होते. सोमवारी (ता. 29) दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालीकाही एकत्र लढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

 

महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस बाकी आहेत. मात्र अजूनही उमेदवार निश्चित झालेले नसल्याने इच्छुकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे.  यामध्ये इच्छुक नाराज उमेदवारांकडून पक्षांतर केले जात आहे.  या “आयाराम गयारामां”ची  उमेदवारी मिळवण्यासाठी घालमेल होताना दिसून येत आहे.  याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला जबर धक्का दिल्याचे दिसून येत आहे.  शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे नेते दत्ता बहिरट यांनी कॉंग्रेसचा हात सोडत घड्याळ हाती बांधले आहे.

दत्ता बहिरट यांनी 2024 ची विधानसभा कॉंग्रेसकडून लढवली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. आता महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, सुरुवातीपासूनच दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र निवडणूक लढतील अशी माहिती समोर येत होती. त्यानंतर चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली. मात्र दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेची तसेच पुणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढण्याबाबतची बैठक झाली होती. आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने पुन्हा ह्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर या चर्चांना स्वत: अजित पवार यांनीही दोन राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली.

या पार्श्वभूमीवर, सोमवारी( ता. 29) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते.  या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जागावाटप आणि उमेदवारांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पुणे महानगरपालिकेत अजित पवार गट सरासरी 125 जागांवर तर शरद पवार गट 40 जागांवर लढेल, असे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने थेट अजित पवारांसोबत युती केल्याने महाविकास आघाडीला  जबर धक्का बसला आहे. यानंतर  ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शरद पवार गटावर कडवट टीका केली आहे. “पिंपरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मविआला धोका दिला,” असा गंभीर आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या पर्श्वभीवर खोचक टोला लगावला आहे. “काका-पुतण्या एकत्र आले म्हणजे हे भाजपसोबत जाण्याचे पाहिले पाऊल आहे.” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने पुण्याच्या राजकारणात नाट्यमय स्थित्यंतर होत आहे. ही युती किती प्रभावी ठरते याकडे पुणेकरांचे लक्ष लागुन आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Uruli Kanchan News: Resolution for fifty percent tax concession approved amidst confusion in the Gram Sabha of Uruli Kanchan; Argument in the Gram Sabha, will there be an extension to pay the house rent?

Uruli Kanchan News: उरुळी कांचन येथील ग्रामसभेत पन्नास टक्के कर सवलतीचा ठराव गोंधळात मंजूर; ग्रामसभेत बाचाबाची, घरपट्टी भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.