Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: उरुळी कांचन येथील ग्रामसभेत पन्नास टक्के कर सवलतीचा ठराव गोंधळात मंजूर; ग्रामसभेत बाचाबाची, घरपट्टी भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार?

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 29 December 2025, 18:37
Uruli Kanchan News: Resolution for fifty percent tax concession approved amidst confusion in the Gram Sabha of Uruli Kanchan; Argument in the Gram Sabha, will there be an extension to pay the house rent?

उरुळी कांचन: मुख्यमंत्री समृद्ध (Uruli Kanchan News) पंचायतराज अभियाना अंतर्गत निवासी मालमत्ता व अन्य थकबाकी करावर 50 टक्के सवलत देण्याचा ठराव गोंधळात मंजूर झाला आहे. उरुळी कांचन ग्रामस्थांच्या उपस्थतीतीत हा ठराव मंजूर करण्यात आला. गोंधळामध्ये काही नागरिकांची बाचाबाची झाली. (Latest Marathi News)

केंद्राच्या महत्त्वाकांक्षी ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) जी राम जी अधिनियम 2025’ या नवीन योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ग्रामसचिवालय येथे सोमवारी (ता. 29) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित विशेष ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

उरुळी कांचनचे सरपंच मिलिंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या सुरवातीला ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश गळवे यांनी मागील ग्रामसभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविल्यानंतर शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर तंटामुक्ती समितीच्या निवडीबाबत मुद्दा उपस्थित झाला. यावरून गोंधळ निर्माण झाला. यावरून प्रकाश गळवे यांनी तंटामुक्ती समितीच्या निवडीचे पत्र अद्याप दिले नसल्याची तोंडी माहिती दिली.

माजी उपसरपंच रामभाऊ तुपे यांनी 50 टक्के सवलत देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद जगताप व ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश गळवे यांच्याकडे केली होती. अथवा माजी उपसरपंच रामदास तुपे यांनी शेकडो नागरिकांच्या सह्याचे पत्र दिले होते. या निर्णयाची ग्रामसभेत अंमलबजावणी न झाल्यास नागरिकांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोर्चा काढून निषेध करणार असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन व तुपे यांनी जाहीर केले होते.”

यावेळी या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश गळवे यांनी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियमाची मनेरगाची जागा आता ही नवीन योजना घेणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावणे, आजीविकेचे विविधीकरण करणे आणि सामाजिक-आर्थिक पाया भक्कम करणे हा आहे. योजनेच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. यात त्यांनी या योजनेअंतर्गत अकुशल काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना एका आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या मजुरी-रोजगाराची वैधानिक हमी देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यास मदत होईल आणि स्थानिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध होईल असे स्पष्ट केले.

दरम्यान, 50 टक्के सवलत देण्याच्या बाबतीत उरुळी कांचनच्या माजी उपसरपंच संचिता कांचन यांनी ग्रामसभेत ठाराव मांडला. याला रामभाऊ तुपे यांनी अनुमोदन दिले. यावेळी गोंधळ सुरु झाला. व गोंधळातच सरपंच मिलिंद जगताप यांनी मंजूर अशी घोषणा करून ग्रामसभा संपल्याची घोषणा केली. व त्या ठिकाणावरून निघून गेले. त्यानंतर या योजनेबाबत माजी सरपंच संतोष कांचन यांनी गोंधळलेल्या नागरिकांना या योजनेविषयी माहिती दिली. उपस्थित नागरिकांनी या योजनेचे स्वागत केले. व घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या ग्रामसभेला जिल्हा नियोजन समितीचे अलंकार कांचन, माजी सदस्य संतोष कांचन, सरपंच मिलिंद जगताप, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, ऋतुजा कांचन, माजी उपसरपंच संचिता कांचन, सीमा कांचन, अनिता तुपे, रामभाऊ तुपे, जितेंद्र बडेकर, शंकर बडेकर, युवा नेते अजिंक्य कांचन, सागर कांचन, काळूराम मेमाणे, अभि कांचन, सागर पांगारकर, योगेश कांचन, सविता कांचन, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, आदी उपस्थित होते.

ग्रामसभा संपली असे जाहीर झाल्याने नागरिक गोंधळले या सर्व नागरिकांना माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना या योजनेची माहिती मिळू शकली. 50 टक्के सूट रहिवासी व व्यावसायिक हि दोन्ही रक्कम भरावी लागणार आहे. हि माहिती देणे गरजेचे होते. तसेच ग्रामपंचायतीकडून 15 दिवसांचा उशीर झाल्याने नागरिकांना आणखी 15 दिवसांची मुदत वाढ देण्यात यावी. तंटामुक्तीची निवड झाली नसून अद्याप पत्र देण्यात आले नाही असेही ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश गळवे यांनी सांगितले.

  1. -संतोष कांचन, माजी सरपंच, उरुळी कांचन, ता. हवेली
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Crime News: Shakuni uncle's exploits! Nephew's love affair with uncle's girlfriend; Bloody thrill of blackmail and murder...

Crime News: शकुनी मामाचा कारनामा! भाच्याचे मामाच्याच गर्लफ्रेंडशी प्रेमसंबंध; ब्लॅकमेल अन् खुनाचा रक्तरंजित थरार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.