Pune Crime News : पुणे : शहरातील धानोरी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २१ लाख १३ हजार ७४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सिद्धार्थनगर येथील एका घरावर छापा टाकून दोन राजस्थानी तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून १०२ ग्रॅम मेफेड्रॉन, १०२ ग्रॅम डोडा चुरा, मोबाईल, रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक वजनकाटा जप्त करण्यात आला आहे. Pune Crime News

अटक करण्यात आलेल्यांची नावे करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित (वय ४१) आणि राजुसिंह सहदेवसिंह राजपुरोहित (वय ४२) अशी आहेत. दोघेही मूळचे राजस्थान राज्यातील रहिवासी असून सध्या पुण्यात वास्तव्यास होते. Pune Crime News

अंमली पदार्थ विरोधी पथकाला १५ मे २०२६ रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, धानोरीतील सिद्धार्थनगर परिसरातील चक्रधन निवास येथे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित घरावर छापा टाकला. तपासादरम्यान घरातून मेफेड्रॉन, डोडा चुरा, दोन मोबाईल, रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Pune Crime News

प्राथमिक चौकशीत आरोपींनी हे अंमली पदार्थ राजस्थानमधून आणल्याची कबुली दिली असून, पुणे परिसरातील राजस्थानी समाजातील व्यक्तींना त्याची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले पुढील तपास करीत आहेत. Pune Crime News
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड आणि त्यांच्या पथकाने केली. Pune Crime News







