Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 May 2026, 16:40

 Daund News  दौंड, ता. १७ : पाटस-दौंड मार्गावरील निष्काळजी प्रशासनाचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला असून, गतीरोधकावर पांढऱ्या पट्ट्या नसल्यामुळे दोन कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी (ता. १७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. पाटस ग्रामपंचायत हद्दीतील अंबिका पब्लिक स्कूलसमोर झालेल्या या अपघातात सहा जण जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Daund News

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा नेक्सोन कार दौंडहून पुण्याकडे जात होती, तर बलोनो कार पाटसकडून दौंडच्या दिशेने येत होती. रस्त्यावर असलेल्या गतीरोधकावर कोणत्याही प्रकारच्या पांढऱ्या चेतावणी पट्ट्या नसल्याने नेक्सोन चालकाला गतीरोधकाचा अंदाज आला नाही. भरधाव वेगात असलेल्या कारने अचानक गतीरोधकाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, नेक्सोन कारचे एक चाक तुटून समोरून येणाऱ्या बलोनो कारवर आदळले. Daund News

 

या भीषण अपघातात बलोनोमधील चार आणि नेक्सोनमधील दोन जण असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याने घटनास्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. Daund News

स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “गतीरोधकावर पांढऱ्या पट्ट्या माराव्यात” अशी मागणी अनेक वेळा करूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. Daund News

दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.