Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेजुरीत पुन्हा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! लक्ष्मीनारायण लॉजवरुन ६ महिलांची सुटका, चालक अटकेत

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 July 2026, 14:29

पुणे : जेजुरी (ता. पुरंदर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पर्दाफाश करण्यास पुणे ग्रामीण पोलिसांना २० जुलै रोजी सायंकाळी यश आले आहे. लक्ष्मीनारायण लॉजवर धडक कारवाई करत ६ पीडित महिलांची सुटका केली आहे. तर लॉज चालकाला अटक केली आहे. वारंवार कारवाई होऊनही त्याच ठिकाणी पुन्हा देहव्यापार सुरू असल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

रामा नारायण मोगविरा असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण माने आणि जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पाटील यांना लक्ष्मीनारायण लॉजमध्ये महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जेजुरी पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक आणि पंचांच्या उपस्थितीत रात्री सुमारे ९ वाजता लॉजवर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान लॉज चालक रामा नारायण मोगविरा ताब्यात घेण्यात आला. तसेच तेथून ६ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार, पोलीस उपनिरीक्षक पाटील, तारडे,वार, सहाय्यक फौजदार ढमाळ, पोलीस हवालदार खाडे, देशमुख, कदम, नांगरे पोलीस अंमलदार गौरव गुजेगावकर, बाळासो कारंडे, लक्ष्मीकांत पांढरे, रोहन शिरगावकर, सोमनाथ माळी, योगेश वाल्हेकर यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील करीत आहेत.

 

वारंवार कारवाई, तरीही पुन्हा तोच प्रकार?

लक्ष्मीनारायण लॉजचा चालक रामा नारायण मोगविरा याच्याविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. वारंवार अटक होऊनही तो जामिनावर बाहेर येत पुन्हा कथित देहव्यापार सुरू करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे आता केवळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यापेक्षा, संबंधित लॉजचा परवाना रद्द करणे किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लॉज सील करण्याची कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे, २०२१ मध्ये यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निसर्ग लॉजवर अशाच प्रकारची कारवाई झाल्यानंतर महसूल प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून ते हॉटेल सील करण्यात आले होते आणि ते अनेक वर्षे बंद राहिले. त्याच धर्तीवर लक्ष्मीनारायण लॉजबाबतही कठोर निर्णय घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22

जरांगे पाटलांचा सज्जड दम झुगारून एकनाथ शिंदे परभणीच्या दिशेने रवाना; राजकीय संघर्षाचा थरार टोकाला!

Sunday, 30 August 2026, 14:18

‘माफी मागायला ये’ म्हणत डिलिव्हरी बॉयला चौकात बोलावलं; महिला मॅनेजरनेच कोयता काढला, पुण्यात खळबळ!

Sunday, 30 August 2026, 14:04

रांजणगाव गणपती -सोने सांगवी रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू…..

Sunday, 30 August 2026, 13:54

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03
Next Post

NEET पेपरफुटी तपासात मोठा स्फोट! CBI च्या 4 प्रश्नांनी प्राध्यापक गार,तब्बल 6तास चौकशी ; मोबाईल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp