Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 August 2026, 14:22

पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये ‘पुणे ग्रँड टूर’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी भव्य रस्ता सुधारणा मोहीम हाती घेण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 900 कोटी रुपये खर्चून 662 किलोमीटर लांबीचे रस्ते नव्याने विकसित केले जाणार आहेत. कामांचा दर्जा आणि गती यावर प्रशासनाचा विशेष भर असून, रस्त्यांची प्रत्यक्ष निर्मिती 1 सप्टेंबरपासून सुरू होऊन 31 डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे कडक नियोजन आखण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अत्यंत कडक आदेश दिले आहेत. या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव किंवा हस्तक्षेप अजिबात सहन केला जाणार नाही. गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या अथवा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर थेट दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. यासोबतच देखरेखीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई केली जाईल.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 437 किलोमीटर रस्त्यांचे सक्षमीकरण करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यात 11 तालुक्यांचा समावेश असून आणखी 662 किलोमीटरचे रस्ते जोडले जातील. अशा प्रकारे दोन्ही टप्पे मिळून संपूर्ण जिल्ह्यात एकूण 1,099 किलोमीटर रस्त्यांचे जाळे तयार होणार आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील या कामांसाठी बांधकाम विभागाला 365 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रस्त्यांच्या निर्मितीदरम्यान वापरात येणाऱ्या साहित्याचा दर्जा, डांबरीकरणाची गुणवत्ता, रस्त्याची जाडी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचे सर्व नियम योग्यरीत्या पाळले जात आहेत की नाही, याची सातत्याने तपासणी केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पारदर्शक पद्धतीने कंत्राटदार निवडण्याचे आणि कामाच्या प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक चाचण्या घेण्याचे निर्देश दिले आहेत. ठरलेल्या वेळेत आणि उच्च गुणवत्तेसह कामे पूर्ण करून जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडकडे आली अन् त्यानंच केला घात! दारूच्या दुकानासमोरून अपहरण; निर्जनस्थळी मारहाण अन् गरोदर गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp