Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दूध अन् तेलानंतर आता मुंढेंचा मोर्चा मसाल्यांकडे! मसाल्यांच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कडक आदेश जारी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 20 October 2026, 19:15

मुंबई : दूध आणि खाद्यतेलातील भेसळीविरोधात कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार मसाले मिळावेत, हा या मोहिमेचा उद्देश आहे. मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग, स्टार्च, लाकडाचा भुसा आणि इतर अयोग्य पदार्थ मिसळून वजन वाढवण्याचे प्रकार आढळल्याने प्रशासनाने तपासणी आणि कारवाईवर भर दिला आहे.

हळद, मिरची पावडर, धणे, जिरे, काळीमिरी आणि खसखस यांसारख्या दैनंदिन वापरातील मसाल्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान काही मसाल्यांच्या नमुन्यांमध्ये प्रतिबंधित आणि आरोग्यास घातक रंग आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मसाल्यांमध्ये अशा रंगांचा वापर करणे तसेच वजन वाढवण्यासाठी स्टार्च, लाकडाचा भुसा किंवा अन्य अयोग्य पदार्थ मिसळणे याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. मसाल्यांवर प्रक्रिया करताना आरोग्यास हानिकारक असलेल्या इथिलीन ऑक्साइडचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

मसाल्यांच्या विक्रीत पारदर्शकता राहावी आणि भेसळ आढळल्यास संबंधित उत्पादकाचा शोध घेता यावा, यासाठी पॅकिंग आणि लेबलिंगच्या नियमांवर भर देण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार मसाले योग्य पॅकिंगमध्ये विकणे आवश्यक असून, विक्रेते आणि उत्पादकांकडे वैध अन्न परवाना असणे बंधनकारक आहे. पॅकिंगवर घटकांची माहिती, उत्पादकाचा तपशील आणि मुदत संपण्याची तारीख स्पष्टपणे नमूद करावी लागणार आहे.

मसाल्यांचे उत्पादन, वाळवणे आणि साठवणूक करताना स्वच्छतेचे नियम पाळणेही आवश्यक आहे. जनावरांच्या गोठ्याजवळ किंवा अस्वच्छ परिसरात मसाले वाळवणे आणि साठवणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच भेसळयुक्त मसाल्यांची निर्मिती किंवा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पशुपालकांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय; चारा बियाणे योजनेच्या अटी शिथिल

Tuesday, 20 October 2026, 19:44

लाडक्या बहिणींनो या दिवाळीत दुप्पट रक्कम खात्यात जमा होणार? थेट ३ हजार रुपये मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Tuesday, 20 October 2026, 19:24

दूध अन् तेलानंतर आता मुंढेंचा मोर्चा मसाल्यांकडे! मसाल्यांच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कडक आदेश जारी

Tuesday, 20 October 2026, 19:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३० ऑक्टोबरपर्यंत संधी

Tuesday, 20 October 2026, 18:46

टायगर श्रॉफ लक्ष्य नव्हताच! हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता मोठा व्यक्ती; आरोपीच्या स्टेटमेंटने तपासाला वेगळं वळण..

Tuesday, 20 October 2026, 17:48
Next Post

लाडक्या बहिणींनो या दिवाळीत दुप्पट रक्कम खात्यात जमा होणार? थेट ३ हजार रुपये मिळणार? जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp