Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खडकवासला चौपाटीवर सुरक्षा रक्षक ठरले जखमी तरुणासाठी देवदूत! BMWच्या धडकेत जखमी तरुणाला हरिदास वऱ्हाड यांच्यासह सहकाऱ्यांची तत्पर मदत

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 25 October 2026, 17:25

खडकवासला, (पुणे) : खडकवासला धरण चौपाटी परिसरात बीएमडब्ल्यू कार आणि रॉयल एनफिल्ड बुलेट यांच्यात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ उपचार मिळण्यास मदत झाली. पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांनी सहकाऱ्यांसह तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखत त्यांनी जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

ही घटना खडकवासला धरण चौपाटी परिसरात रविवारी (ता. 25) दुपारी तीनच्या सुमारास घडली. बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत पलाश बोन्द्रे (वय-26) हा तरुण जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच हरिदास वऱ्हाड यांच्यासह राजू उंडे, योगेंद्र जाधव आणि गणेश दळवी यांनी मदतकार्य सुरू केले. त्यांनी जखमी तरुणाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यासह पोलिसांशी संपर्क साधणे आणि उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सहकार्य केले. पलाश याला प्रथम संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले.

हरिदास वऱ्हाड हे सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत असतानाच सामाजिक बांधिलकीही जपत आहेत. संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. खोल पाण्यात आत्महत्येच्या उद्देशाने उतरलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांचे समुपदेशन करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करणे, तसेच रात्री-अपरात्री गरजू युवतींना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्यास मदत करणे, अशा विविध कामांतून त्यांनी माणुसकी जपली आहे.

हरिदास वऱ्हाड हे हवेली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या रेस्क्यू टीमचे सदस्य आहेत. आपत्कालीन परिस्थितीत ते अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाला मदत व सहकार्य करतात. स्वतःचा वेळ आणि श्रम खर्च करून नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. या मदतकार्यात त्यांच्या सहकारी सुरक्षा रक्षकांचाही महत्त्वपूर्ण सहभाग असतो. कर्तव्य बजावताना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून संकटग्रस्तांना मदतीचा हात देणारे हरिदास वऱ्हाड आणि त्यांचे सहकारी यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09

तरुण PMP बसमध्ये चढला, तिकीट दाखवलं अन् कंडक्टरला संशय येताच…पुण्यात ७० रुपये वाचवण्यासाठी पदवीधराचा प्रताप

Monday, 26 October 2026, 16:57

डॉक्टर की नराधम! महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार; व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार, भाजप पदाधिकाऱ्यालाही अटक, नेमकं प्रकरण काय?

Monday, 26 October 2026, 16:49

वाहनधारकांनो सावधान! आता HSRP नंबर प्लेट नसेल तर थेट होणार कारवाई; प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु

Monday, 26 October 2026, 16:06

पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना! जुन्नरमध्ये वीजपंपाचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू; परिसरात हळहळ

Monday, 26 October 2026, 16:04

चक्रीवादळाचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात 140 किमी वेगाने वाहणार वारे अन् मोठं संकट; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? वाचा

Monday, 26 October 2026, 15:54
Next Post

ऐन दिवाळीत सोनं खरेदीचा विचार करताय? तर ग्राहकांनो सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या सविस्तर अपडेट...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp