Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जरांगे पाटलांचा सज्जड दम झुगारून एकनाथ शिंदे परभणीच्या दिशेने रवाना; राजकीय संघर्षाचा थरार टोकाला!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 30 August 2026, 14:18

बीड: परभणीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मेळाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झालेल्या संजय जाधव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

परभणीच्या जिल्हा क्रीडा संकुलावर होणाऱ्या या मेळाव्यात ठाकरे गटातील विविध नगरपरिषद, महापालिकांमधील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच अन्य पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, शहरात मोठ्या प्रमाणावर भगवे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत.

मात्र, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासह हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना परभणीत हा कार्यक्रम घेऊ नये, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करताना जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावरही जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या नावाखाली मराठा समाजाच्या भावनांशी खेळल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संजय शिरसाट आणि संजय जाधव यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप करत कार्यक्रम घेऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.

 

जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रतिक्रिया दिली. शिंदे यांनी दिलेले आव्हान आपण स्वीकारत असून, त्याची परतफेड मुंबईत करू, असा इशारा त्यांनी दिला. आपल्या पुढील आंदोलनाची तारीख १२ सप्टेंबरला जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जरांगे यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर परभणीतील वातावरण अधिक संवेदनशील झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. परभणीचे पोलीस अधीक्षक खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी पोहोचले असून, शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरळीत पार पाडणे आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवणे, यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

एकीकडे शिंदे गटाकडून कार्यक्रम नियोजित वेळेनुसार घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे, तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतल्याने परभणीतील राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35

गणेशोत्सवात डीजेवर बंदी? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत; पुण्यातून ध्वनिप्रदूषणाविरोधात कडक आवाहन

Monday, 31 August 2026, 17:06

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52

९१ विद्यार्थ्यांसह रस्त्यावरच भरवावा लागला वर्ग; चांडोहच्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीचे कुलूप!

Monday, 31 August 2026, 16:38

CJPच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; केंद्र-दिल्ली पोलिसांना नोटीस, मोर्च्यावर मात्र बंदी नाही

Monday, 31 August 2026, 16:26
Next Post

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp