राहुलकुमार अवचट

यवत: केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करण्यात आले असून आरोपीकडून ०७ मोटारसायकल जप्त करण्यात आला आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दि. ९ जुलै रोजी सायंकाळी ०५:३० वा च्या सुमारास बोरीपार्धी गावच्या हद्दीतील केडगाव रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या जागेतून मोटार सायकल चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकाने सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने शोध घेतला असता सदर मोटर सायकलची चोरी बालाजी पांडुरंग लोखंडे (रा. मुरुड, ता. लातूर, जि. लातूर) याने केली असल्याची माहिती मिळाली.

याआधारे बालाजी लोखंडे यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. आरोपीला अटक करून अधिक तपास केला असता सदर चोरीस गेलेली मोटारसायकल सह वेगवेगळ्या कंपनीच्या एकुण ७ मोटारसायकल एकुण किंमत अंदाजे एक लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल , बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलिस हवालदार संदिप देवकर, रॉकी देवकाते, अमोल काळे, महेंद्र चांदणे, धिरज जाधव,प्रतिक जगताप, अमोल भुजबळ, सचिन गुंड, मारूती बाराते, दिनेश लोणकर , विनित कुऱ्हाडे यांच्या पथकाने केली.






